उन्हाळ्याचा दिवसात अंड खाणं आरोग्याला त्रासदायक ठरतं का ?

उन्हाळ्याच्या दिवसात भाज्या-फळं  खाण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे उष्णतेचा त्रास कमी होण्यास मदत होते पण मांसाहारींचे काय ?

Updated: Mar 12, 2018, 05:31 PM IST
उन्हाळ्याचा दिवसात अंड खाणं आरोग्याला त्रासदायक ठरतं का ?  title=

मुंबई : उन्हाळ्याच्या दिवसात भाज्या-फळं  खाण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे उष्णतेचा त्रास कमी होण्यास मदत होते पण मांसाहारींचे काय ?

वातावरणातील उष्णतेत आहारातील पदार्थ वाढ करू नयेत म्हणून काहीशी काळजी घेणे आवश्यक आहे. 

झटपट नाश्त्याला तयार होणार्‍या अनेक पदार्थांमध्ये अंड्याचा समावेश होतो. अंड गरम असल्याने काहीजण त्याचा आहारातील समावेश कमी करतात. पण याची  खरच गरज आहे का ? 

काय आहे एक्सपर्ट सल्ला ? 

उन्हाळ्यात अंडी खाणे चूकीचे आहे हा एक गैरसमज आहे. अंड उष्ण असले तरीही ते पूर्ण अन्न आहे. अंड्यामध्ये विविध व्हिटॅमिन्स, मिनरल्स मुबलक प्रमाणात आढळतात. कॅल्शियम,आयर्न, फॉस्फरस या आवश्यक घटकांचा त्यात समावेश असतो. उन्हाळ्यात अंड खाल्ल्याने अपचन होते असा काहींचा समज आहे. परंतू त्यामध्ये काहीच तथ्य नाही. 

अंड्यामुळे उन्हाळ्यातील गरमीचा त्रास कमी होतो. अंड्यामध्ये मुबलक पोषणद्रव्य आढळतात त्यामुळे शरीरातील फ्लुईड घटकांचे प्रमाण राखण्यास मदत होते. अंड्यामुळे थकवा कमी होण्यास, मरगळ दूर होण्यास आणि शरीरातील एनर्जी टिकून राहण्यास मदत होते. 

एका दिवसात किती अंडी खावीत ?

आहारतज्ञांच्या सल्ल्यानुसार उन्हाळ्यात दिवसभरात 1-2 अंडी खाणे योग्य आहे. मात्र यापेक्षा अधिक अंडी खाऊ नयेत. बॉडीबिल्डर किंवा मसल्स कमावण्यासाठी प्रयत्न करणार्‍यांसाठी 4-6 अंडी खाण्याचा सल्ला दिलेला असतो. परंतू उन्हाळ्यात त्यांनीदेखील 2-3 अंडी खावीत.अंडी खाल्ल्याने शरीरात उष्णता निर्माण होते. अतिप्रमाणात अंडी खाल्ल्यास पचनक्रियेत बिघाड होऊ शकतो.  

हेल्दी पर्याय कोणता ? 

कोणत्याही स्वरूपात अंड खाणे हितकारीच आहे. ऑम्लेट किंवा फ्रेंच टोस्ट सारख्या तळकट पर्यायांपेक्षा उकडलेले अंड हे अधिक हेल्दी आहे. त्यामुळे ऑम्लेटपेक्षा उकडलेले अंड खावे.