मुंबई : हिवाळ्याच्या दिवसामध्ये मेथीचे लाडू हमखास बनवले जातात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वजन घटवण्यासाठी, रक्तातील साखरेचे प्रमाण आटोक्यात ठेवण्यासाठी मेथीचा आहरात अवश्य समावेश करावा असे समजले जाते. अनेकजण डोळे झाकून घरगुती उपाय करतात. पण काही वेळेस हे त्रासदायक ठरू शकते. 


पित्ताचा त्रास - 


पित्ताचा त्रास असणार्‍यांनी मेथीचा आहारात समावेश करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.  


अंगाला वास  - 


मेथीचा आहारात अधिक प्रमाणात समावेश झाल्यास तुमच्या शरीराला त्याचा दर्प येतो. प्रामुख्याने गरोदरपणानंतर स्त्रियांना मेथीचे लाडू दिले जातात. पण त्याचे प्रमाण वाढल्यास दूधातून किंवा घामातून उग्र वास जाणवतो.  


ब्लड थिनर्स - 


मेथीमध्ये रक्ताला पातळ करण्याची क्षमता असते. त्यामुळे तुम्ही ब्लड थिनर्स  गोळ्या घेत असाल तर प्रमाणातच मेथीचे लाडू आहारात असावे. अन्यथा अति रक्तस्त्रावाचा धोका असतो.  


इस्ट्रोजेनिक इफेक्ट - 


मेथीमध्ये इस्ट्रोजनिक परिणाम करण्याची क्षमता आहे.  त्यामुळे हार्मोन सेन्सिटीव्ह कॅन्सर असणार्‍या महिलांना मेथीचा आहारात समावेश करणे फारसे सुरक्षित नाही. 


प्रसुतीपूर्व वेदना


मेथी  स्त्रियांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असल्याने त्यांच्या आहारात समावेश केला जातो. मात्र गरोदरपणाच्या काळाच्या त्याचा वापर प्रमाणात करणं आवश्यक आहे. अन्यथा प्रसुतीपूर्व त्रास होण्याचा धोका असतो.