मुंबई :  अनेकदा आपण ताजेतवाने वाटण्यासाठी सकाळी उठल्यावर चहा पितो, ज्याला सामान्यतः बेड टी असे देखील म्हणतात. चहाने दिवसाची सुरुवात करण्याची प्रथा भारतात खूप जुनी आहे. असं केल्याने बऱ्याच लोकांना खूप छान वाटतं, ज्यामुळे ते आपल्या याला दररोजच्या जीवनातील एक पार्ट बनवतात. परंतु तुम्हाला माहित आहे का की रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने आरोग्याला खूप नुकसान होऊ शकते. हो हे खरं आहे. ज्या चहाने आपल्या दिवसाची सुरूवात चांगली होते. तो चहा आपल्या आरोग्याचं नुकसान करत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चला तर जाणून घेऊ या की, ही चहा आपल्या शरीरासाठी कशी हानिकारक आहे.


ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, त्यांनी कधीही बेड टी पिऊ नये. कारण त्यात असलेले कॅफिन शरीरात विरघळताच रक्तदाब वाढवते, ज्यामुळे भविष्यात हृदयविकाराचा धोका संभवतो.


अनेकदा आपण टेन्शन आणि स्ट्रेस कमी करण्यासाठी सकाळी चहा पितो, पण असे केल्याने टेन्शन अधिक वाढू शकते. वास्तविक, चहामध्ये कॅफिनचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे क्षणार्धात झोप उडते, पण त्यामुळे तणाव वाढू शकतो असे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे.


सकाळी रिकाम्या पोटी चहा पिणे पचनासाठी चांगले मानले जात नाही, कारण यामुळे पोटात गॅसची समस्या निर्माण होते आणि पचनक्रिया मंदावते.


सकाळी रिकाम्या पोटी साखरेचा चहा प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढते आणि शरीरातील अनेक पेशींना आवश्यक पोषक द्रव्ये मिळत नाहीत. यामुळे दीर्घकाळ मधुमेहाचा धोका वाढतो.


सकाळी रिकाम्या पोटी चहा पिण्याची ही सवय आजच सोडा, कारण असे केल्याने पोटाच्या आतील भागाला इजा होऊन अल्सर होऊ शकतो.


(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आम्ही तुम्हाला विनंती करतो की कोणताही उपाय करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)