मुंबई : सेलिब्रिटींपासून ते अगदी शालेय जीवनात कमी मार्क मिळाल्याने अनेकजण नैराश्यामध्ये जातात. वेळीच या नैराश्याच्या फेर्‍यातून बाहेर न पडल्यास काही जण आत्महत्येसारखे टोकाचे निर्णय घेतात.  
 काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिस खात्यातील सुपरकॉप हिमांशू रॉय यांनी आजारपणाला कंटाळून आत्महत्येचा निर्णय घेतल्याच्या बातमीने खळबळ उडाली आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्डस ब्युरोच्या माहितीनुसार १८ टक्के लोक आजारपणाला कंटाळून आत्महत्येचा निर्णय घेतात.  ...अखेर ती वेदनाच ठरली हिमांशू रॉयच्या मृत्यूला कारण


 का घेतला जातो आत्महत्येचा निर्णय?  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 तीव्र दु:ख, अपयश, त्रास 
 जवळची व्यक्ती दूर जाणं
आजारपणाला कंटाळून 
मानसिक धक्का
मानसिक आजार  
उतारतावयातील एकटेपणा  


कसे ओळखाल लोकांच्या मनातील आत्महत्येचे विचार? 


अशी व्यक्ती नेहमीपेक्षा शांत राहते आणि मित्रमंडळी, कुटूंब, सहकारी यांच्यापासून अलिप्त राहते.
अशी व्यक्ती सतत तिच्या एकटेपणाबद्दल बोलते
अशा व्यक्तीमध्ये आपण अपयशी,बिनकामाचे आहोत अशा भावना असतात.ते लोक खूप निराशावादी असतात व त्यांच्यात आत्मविश्वास देखील कमी असतो.
पुर्वी आवडणा-या एखाद्या गोष्टींमधला रस आता कमी होणं.
त्यांच्या समस्येवर कोणताही उपाय नसल्याचे त्यांना सतत वाटत असते.
त्यांना कोणाचाही आधार नसल्याचे वाटत राहते.
जिवलग व्यक्तीपासून दूर राहतात.
झोपेच्या व खाण्याच्या सवयी बदलतात.
कंटाळवाणे बोलत राहतात.
स्वत:ला त्रास देत राहतात.
 
आत्महत्येचा विचार मनात येणं हेच आत्महत्या करण्याच्या टोकाच्या निर्णयाबाबतचं पहिलं पाऊल असतं. त्यामुळे अशाप्रकारचे विचार करणार्‍या व्यक्तीला त्यापासून वेळीच दूर करणं आवश्यक आहे. याकरिता अशा टप्प्यातील व्यक्तींच्या बोलण्यात, वागणूकीत काही बदल झालेले दिसले तर त्यांकडे दुर्लक्ष करू नका.