या एका उपायाने सफेद केस होतील काळे
वाढत्या वयासोबत केस पांढरे होणे हे साहजिकच आहे. मात्र हल्ली कोणत्याही वयात केस पांढरे होतात. एक्सपर्टच्या मते केसांचा काळा रंग हा मेलॅनिनमुळे असतो. केसांच्या मुळांशी मेलॅनिन असते. जेव्हा मेलॅनिन हे द्रव्य बनण्याचे काम बंद होते वा कमी होण्यास सुरुवात होते तेव्हा केस पांढरे होऊ लागतात.
मुंबई : वाढत्या वयासोबत केस पांढरे होणे हे साहजिकच आहे. मात्र हल्ली कोणत्याही वयात केस पांढरे होतात. एक्सपर्टच्या मते केसांचा काळा रंग हा मेलॅनिनमुळे असतो. केसांच्या मुळांशी मेलॅनिन असते. जेव्हा मेलॅनिन हे द्रव्य बनण्याचे काम बंद होते वा कमी होण्यास सुरुवात होते तेव्हा केस पांढरे होऊ लागतात.
यासाठी एक घरगुती उपाय आहे ज्यामुळे तुम्ही पांढरे केस काळे करु शकता.
नारळाचे दूध गरम करुन तेल काढा.
दीड कप नारळाच्या तेलात अर्धा-अर्धा कप आवळा आणि कोरफडीचा गर मिसळा.
हे मिश्रण ८-१० मिनिटे उकळवा
थंड झाल्यावर गाळून उन्हामध्ये १० ते १२ दिवस ठेवा
हे मिश्रण दर दोन दिवसांनी केसांना लावा