मुंबई : प्यार दोस्ती है, या शाहरुखच्या फेमस डायलॉगचा प्रत्यय तुम्हालाही आला असेल. हा अनुभव तुमचाच असेल असे नाही. पण आजूबाजूची मंडळी, फ्रेंड्स यांना पाहुन तरी तुम्हाला हे पटले असेल. जवळचे मित्र जोडीदार बनतात, कारण त्यांच्यात जबरदस्त बॉडींग असते. समजूतदारपणा असतो. पण काही वेळेस जवळच्या मित्राचा बदललेला अंदाज नक्की काय सांगतो, याचा विचार केलाय? तर तुमच्या जवळच्या मित्राला/मैत्रिणीला तुमच्याबद्दल काहीतरी स्पेसल वाटू लागल्याचे या ४ गोष्टींवरुन ओळखा...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

# तिचे/त्याचे नाव ऐकल्यावर चेहऱ्यावर हसू उमटते किंवा हृदयात धडधड वाढते. तर हा प्रेमाचा इशारा आहे. त्या मित्राची/मैत्रिणीची साथ अधिक आवडू लागते, असे होत असल्यास तुमच्याकडून प्रेमाला हिरवा झेंडा दाखवला जात आहे.


# मुली शॉपिंगसाठी अत्यंत क्रेझी असतात. तसंच त्यांना एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी खूप वेळ लागतो. पण याशिवाय शॉपिंग करताना ती प्रत्येक गोष्टीत तुमचा सल्ला घेत असेल तर हा प्रेमाचा इशारा आहे.


# कालपर्यंत तुमची फेवरेट डीश न आवडणाऱ्या तुमच्या मित्राला अचानक ती आवडू लागल्यास काहीतरी गडबड नक्कीच आहे. त्याच्या आवडीपेक्षा तो जर तुमची आवड जपत असेल तर समजू जा, बंधा प्यार में है.


# सारखे मोबाईलमध्ये पाहणे. खास मित्राच्या/मैत्रिणीच्या फोनची, मेसेजची वाट पाहणे. डोळे बंद करताच डोळ्यासमोर त्याचा/तिचा चेहरा उभा राहणे. याशिवाय त्याच्या/तिच्या लहान सहान गोष्टी, बालिश बोलणे, वागणे आवडू लागणे ही सर्व प्रेमाची लक्षणे आहेत.  बेस्ट फ्रेंड आवडू लागल्यास या ३ गोष्टी करा!