skin care : दुधाची साय चेहऱ्यावर लावल्यास तुम्हाला `हे` फायदे होतील, जाणून घ्या
पण त्यासाठी तुम्हाला दुधाची साय कशी वापरली जाते आणि त्याचे आपल्याला काय फायदे होतात आज आपण हे जाणून घेणार आहोत..
Happy Diwali 2022: सण आल्यावर आपण अतिरिक्त काळजी घेतो ती म्हणजे त्वचेची. आपल्याला सगळ्यांमध्ये उठून दिसायचे असते. मग अनेकदा आपण नाना प्रकारचे उपाय करुन पाहतो. काही वेळेस ते उपाय फसतात तर काही वेळेस ते उपाय आपल्यासाठी फायदेशीर ठरतात. या दिवाळीत तुम्हाला ग्लोइंग स्किन मिळवायची असेल तर महागडे प्रोडक्ट्स किंवा फेस ट्रीटमेंट घेण्याची गरज नाही. घरी राहून तुम्ही ही इच्छा सहज पूर्ण करू शकता. तुम्हाला माहितेय का, तुम्ही दुधाची सायच्या माध्यमातून ही तुमच्या त्वचेवर चमक आणू शकता. पण त्यासाठी तुम्हाला दुधाची साय कशी वापरली जाते आणि त्याचे आपल्याला काय फायदे होतात आज आपण हे जाणून घेणार आहोत..(skin care applying milk powder on the face will give you these benefits nz)
आणखी वाचा - रोज सकाळी 'ही' पानं उकळून प्या, 'हे' होतील फायदे
दुधाच्या साय वापरण्याचे फायदे :
1. चेहऱ्यावरील डाग होतात दूर (Eliminates Dark Spots)
2. टॅनिंगपासून सुटका मिळते (Removes tan)
3. त्वचा चमकदार होते (Glowing skin)
4. एजिंगची समस्या कमी होते (Getting Rid of Fine Lines and Wrinkles)
5. उत्तम मॉईस्चराईझर (Best Moisturizer)
6. त्वचेच्या समस्या दूर होतात (Cures Acne and Eczema)
7. त्वचा मऊ आणि मुलायम होते (Softens the Skin)
आणखी वाचा - Prabhas Birthday: प्रभासला कधीच अभिनेता बनायचं नव्हतं,पण...
दुधाची साय कशी वापरावी?
1. तुम्ही तुमच्या त्वचेवर दुधाची साय आणि मध वापरू शकता. अशा स्थितीत, एका भांड्यात हे दोन्ही चांगले मिसळा आणि ते मिश्रण तुमच्या त्वचेवर 10 ते 15 मिनिटे लावा. आता तुमची त्वचा सामान्य पाण्याने धुवा. असे केल्याने मुरुम, व्हाईटहेड्स, ब्लॅकहेड्स इत्यादी समस्यांपासून सुटका मिळते.
2. तुम्ही तुमच्या त्वचेवर हळद आणि दुधाची साय देखील लावू शकता. हे मिश्रण खूप उपयुक्त आहे. अशा स्थितीत, हे दोन्ही चांगले मिसळा आणि 10 ते 15 मिनिटे त्वचेवर लावा. यानंतर तुमची त्वचा सामान्य पाण्याने धुवा. असे केल्याने त्वचेवरील डाग दूर होतात. आणि त्वचा तेजस्वी दिसेल.
आणखी वाचा - Malaika Arora Birthday : मलायकाच्या वाढदिवसानिमित्त 'हा' धक्कादायक किस्सा आला समोर, जाणून घ्या
(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)