Prabhas Birthday: प्रभासला कधीच अभिनेता बनायचं नव्हतं,पण...

अभिनेता प्रभास (Prabhas) हा साऊथमध्ये प्रचंड प्रसिद्ध आहे. त्यांन त्याच्या अभिनयाने भारतातच नाही तर जगभरात स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. 

Updated: Oct 23, 2022, 05:00 PM IST
Prabhas Birthday: प्रभासला कधीच अभिनेता बनायचं नव्हतं,पण...  title=
prabhas birthday prabhas never wanted to be an actor but nz

Prabhas Birthday: अभिनेता प्रभास (Prabhas) हा साऊथमध्ये प्रचंड प्रसिद्ध आहे. त्यांन त्याच्या अभिनयाने भारतातच नाही तर जगभरात स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. त्याला त्याच्या स्टारडमसाठी ओळखले जाते. आज म्हणजेच 23 ऑक्टोबरला प्रभास त्याचा 43 वा वाढदिवस साजरा करत आहे.  त्यांचा जन्म चित्रपट निर्माता उप्पलापती सूर्य नारायण राजू यांच्या पोटी झाला. रील लाइफमध्ये खूप रोमँटिक आणि अँग्री तरुण म्हणून दिसणारा प्रभास खऱ्या आयुष्यात खूप लाजाळू आहे. तुम्हाला हे जाणून धक्का बसेल की, प्रभासला कधीच अभिनेता बनण्याची इच्छा नव्हती. चित्रपटात येण्यामागेही त्याची वेगळी कहाणी आहे. (prabhas birthday prabhas never wanted to be an actor but nz)

हे ही वाचा - Malaika Arora Birthday : मलायकाच्या वाढदिवसानिमित्त 'हा' धक्कादायक किस्सा आला समोर, जाणून घ्या

'बाहुबली'मुळे नशीब खुललं

सुपरस्टार अभिनेता प्रभासने अनेक सुपरहिट साऊथ चित्रपटांमध्ये काम केले आहे, जे नंतर हिंदीतही डब केले गेले. 'बाहुबली' नंतर त्याला देशभर लोकप्रियता मिळाली असली तरी. या चित्रपटाने बॉक्स ऑफिस कमाईच्या बाबतीत सर्व रेकॉर्ड तोडले होते. प्रभासचं जरी चित्रपटांचं बॅकग्राउंड असलं तरी त्याला चित्रपटात काम करण्याची काडीची इच्छा नव्हती. तो खाण्यापिण्याचा शौकीन आहे आणि या कारणास्तव त्याला हॉटेल व्यवसायात जायचे होते.

 

अभिनेता बनण्याची रंजक कहाणी

प्रभासच्या अभिनेता होण्यामागेही एक गोष्ट आहे. ती प्रत्येकालाच माहित नसावी आज आम्ही तुम्हाला त्याविषयी सांगणार आहोत... मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रभासचे काका एक चित्रपट बनवत होते, चित्रपटातील नायकाचे पात्र प्रभासला खूप मिळतं जुळतं होते. अशा परिस्थितीत काकांनी प्रभासला चित्रपटात काम करण्यासाठी राजी केले आणि तिथूनच त्याच्या फिल्मी करिअरला सुरुवात झाली. 2000 साली आलेला 'ईश्वर' हा त्याचा पहिला चित्रपट होता, पण त्या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला कमाई करता आली नाही. पण त्याने प्रयत्न सोडले नाहीत यानंतर 'पूर्णामी', 'एक निरंजन', 'मुन्ना', 'बिल्ला' आणि 'योगी' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले.

हे ही वाचा -  जान्हवीने परिधान केला ट्रान्सपरंट ड्रेस, Video आला समोर...

 

 

 

6000 हून अधिक लग्नांना नकार 

तुम्ही प्रभासला कोणत्याही जाहिरातीमध्ये क्वचितच पाहिले असेल, कारण तो ब्रँड्सचे समर्थन करत नाही. प्रभासने आतापर्यंत फक्त एकाच ब्रँडसाठी प्रचार केला आहे, जी महिंद्राच्या TUV 300 ची जाहिरात होती. अहवालानुसार, त्याने 2020 मध्ये सुमारे 150 कोटींच्या जाहिरातींच्या ऑफर नाकारल्या होत्या. प्रभासला चाहत्यांनी प्रेमाने 'डार्लिंग प्रभास' देखील म्हटले आहे, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की त्याने आतापर्यंत 6000 हून अधिक लग्नांना नकार दिला आहे.