Skin Care Tips for Pimples​: सध्याच्या जमान्यात खाण्यापिण्याच्या सवयी आणि जीवनशैलीच्या वाईट सवयीमुळे आपल्या त्वचेवरही परिणाम झाला आहे. त्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स (Pimples), मुरुम (Acne), कोरडेपणा (Dryness), निस्तेज (Dullness) अशा समस्या उद्भवू शकतात. आज आपण मुरुमांबद्दल बोलत आहोत, ज्यामुळे चेहऱ्याच्या सौंदर्यावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे चेहऱ्यावर काळे डाग पडतात. सामान्यत: जेव्हा आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स येतात तेव्हा आपल्याला चिंता आणि तणाव जाणवू लागतो. ज्यामुळे आपण अशा अनेक चुका करतो. ज्या चेहऱ्यासाठी हानिकारक ठरु शकतात. या चुका टाळण्यासाठी एक काम करा. जेव्हा मुरुमे होतात तेव्हा काय करु नये, हे जाणून घ्या.


पिंपल्स अर्थात मुरुम झाले तर या चुका करु नका!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1. मुरुमांना वारंवार स्पर्श करणे
 चेहऱ्यावर मुरुम अर्थात पिंपल्स झाले तर लोक वारंवार आरशात पाहून त्याला स्पर्श करतात. परंतु असे करणे आपल्यासाठी हानिकारक आहे. कारण अनेकदा आपले हात घाण असतात आणि असे केल्याने हातांची घाण मुरुमांवर येते आणि त्वचेला संसर्ग होण्याचा धोका असतो. जास्त स्पर्श केल्यावर मुरुम फुटू शकतात आणि कोरडे झाल्यानंतर डाग दिसू लागतात.


2. चेहरा सातत्याने फेसवॉशने धुतला जातो
अनेक वेळा मुरुमांपासून सुटका मिळवण्यासाठी चेहरा पुन्हा-पुन्हा धुण्यास सुरुवात करतात. परंतु असे केल्याने त्वचा कोरडी आणि निर्जीव होते. त्वचेची आर्द्रता कमी झाल्यामुळे चेहरा कोमजलेला दिसू लागतो. विशेषतः हिवाळ्यात अशी चूक करु नका. दिवसातून दोन वेळा चेहरा धुणे पुरेसे आहे.


3. फेसवॉश चुकीचा 
फेसवॉश केल्याने चेहरा स्वच्छ होऊ शकतो आणि मुरुमांपासून मुक्त होण्यास मदत होते. परंतु अनेकवेळा आपण योग्य फेसवॉश निवडत नाही. यासाठी त्वचा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा जेणेकरुन तुमची स्क्रीन नॉर्मल आहे की कोरडी, तेलकट, मिश्रित की संवेदनशील आहे हे कळू शकेल. त्वचेचा प्रकार जाणून घेतल्यानंतर, त्यानुसार योग्य फेसवॉश खरेदी करा, अन्यथा फायदा मिळवण्याच्या प्रयत्नात तुम्ही स्वतःच्या चेहऱ्याचे आणि त्वचेचे नुकसान कराल.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)