Facepack : चेहऱ्याची काळजी घेणे खुप गरजेचे आहे. रात्री झोपताना फेसपॅक (Facepack) कसा तयार करायचा, त्याचे काय फायदे आहे याविषयीची माहिती इथे आम्ही सांगणार आहोत...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Face Pack For Glowing Skin: चेहऱ्याची काळजी घेणे खुप महत्वाचे आहे. हल्ली वाढलेल्या प्रदुषणामुळे (Polution) चेहऱ्याची जितकी काळजी घेतली जाईल तितका वेळ चेहऱ्यावरील ग्लो दिसेल. पण लोक सध्या धावपळीमुळे फारसं लक्ष देत


नाहीत. मग परिणामी आपल्याला चेहऱ्यावर पुरळ येणे, पीम्पल्स येणे, चेहऱ्यावर खाज येणे, चेहरा ड्राय होणे असे बरेचसे त्रास सुरु होतात. मग आपण झोपेतून जागे होतो आणि यूट्युबवर झटक्यात चेहऱ्यावर ग्लो (Skin Glow) कसा येईल? याच्या व्हिडीओ


पाहु लागतो. त्या व्हिडीओत यूट्युबरने सांगितल्याप्रमाणे आपण काही केमिकल वस्तू (Chemical Product) खरेदी करतो. कालातंराने ते प्रोडक्टस आपल्या चेहऱ्यावर चांगले परिणाम करत नाहीत. त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर ग्लो नाही दिसत तो रखरखीत


दिसू लागतो. 


आम्ही तुम्हाला यामध्ये असे घरगुती उपाय (Solution) सांगणार आहोत ज्यामध्ये तुमचा चेहरा तजेलदार आणि टवटवीत दिसेल. तुम्हाला जास्त खर्च करावा लागणार नाही तर पाहुया रात्री झोपतानाचा फेसपॅक...


रात्री झोपतानाच का फेसपॅक लावावा?


दिवसभर जसे आपण थकलेले असतो तसाच आपला चेहरा सुद्धा थकलेला असतो. त्यामुळे चेहऱ्याची काळजी रात्री घेणे खुप गरजेचे आहे. रात्री झोपताना फेसपॅक (Facepack) लावल्यास चेहरा दिवसभर तुकतुकीत राहतो. रात्री फेसपॅक लावल्यास तो


चेहऱ्यात चांगलाच मुरतो.  त्यामुळे चेहऱ्याला खुप फायदे (Advantages) होतात. 


आणखी वाचा... Health Tips: सकाळी चूळ न भरता पाणी पिण्याचे अनोखे फायदे, जाणून घ्या


तुम्हाला फायद्यांसकट 3 प्रकारचे फेसपॅक सांगणार आहोत :


मलाई आणि गुलाबजल फेसपॅक (Malai and rose water face pack)


हा फेसपॅक बनवण्यासाठी मलाई आणि गुलाबजल एका वाटीत घेऊन त्यांचे चांगले मिश्रण करा. आता या फेसपॅकला चेहरा आणि मानेवर हलक्या हाताने मालिश करत लावा. हा फेसपॅक चेहऱ्यावर 15 ते 20 मिनिटांपर्यंत ठेवा आणि नंतरला कोमट पाण्याने


चेहरा धुवा. हा फेसपॅक लावल्याने चेहऱ्याला पोषण मिळते आणि चेहऱ्यावर ग्लो येतो. 


लिंबू आणि मधाचा फेसपॅक (Lemon and honey face pack)


लिंबू आणि मधाचा फेसपॅक बनवण्यासाठी एका वाटीत लिंबाचा रस आणि मध यांचे मिश्रण तयार करा. आता या मिश्रणाला चेहरा आणि मानेवर लावा. हा  फेसपॅक 15 मिनिटांपर्यंत चेहऱ्यावर ठेवा आणि मग चेहरा कोमट पाण्याने धुवा. हा फेसपॅक दररोज


लावल्याने फ्रॅकल्सची समस्या कमी होते. 


हळद आणि दुधाचा फेसपॅक (Turmeric and milk face pack)


हळद आणि दुधाचा फेसपॅक तयार करण्यासाठी एका वाटीत हळद आणि दुधाचे मिश्रण तयार करा. या मिश्रणाला चेहरा आणि मानेवर लावा. या फेसपॅकमुळे चेहरा चमकदार होतो. 


आणखी वाचा... MHT CET 2022 Result: MHT CET चा 100 टक्के निकाल जारी, पाहा Result


(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ते अवलंबण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE NEWS याची पुष्टी करत नाही.)