फक्त करा `हा` उपाय... ७ दिवसात मिळेल ग्लोईंग स्किन
जाहिराती पाहून वेगवेगळे प्रॉडक्ट्स स्किनवर ट्राय करतो,बऱ्याच वेळा केमिकल प्रोडक्ट्स आपल्या स्किनवर सूट होत नाहीत आणि त्याची उलट रिऍक्शन होते
सुंदर दिसण्यासाठी आपण सगळेच प्रयत्न करत असतो ,चमकदार आणि पिंपल फ्री स्कीन ही प्रत्येकाची इच्छा असते.
कामाचा ताण तणाव ,प्रदूषण,ग्लोबल वॉर्मिंग या सगळ्यांच आपल्या त्वचेवर खूप परिणाम होत असतो.
त्यासाठी आपण अनेक सौंदर्य प्रसाधनांचा वापर करतो,फेस वॉशपासून फेस पॅकपर्यंत सर्व काही लावतो ,जाहिराती पाहून वेगवेगळे प्रॉडक्ट्स स्किनवर ट्राय करतो,बऱ्याच वेळा केमिकल प्रोडक्ट्स आपल्या स्किनवर सूट होत नाहीत आणि त्याची उलट रिऍक्शन होते आणि स्किन छान होण्याऐवजी आणखी खराब होऊ लागते..
आयुर्वेदात अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्याचा वापर वर्षानुवर्षे सौंदर्य वाढवण्यासाठी केला जात आहे ,पण जाहिरातींना बळी पडून आपण याकडे दुर्लक्ष करून केमिकलयुक्त क्रीम्स आणि सौंदर्य प्रसाधनांचा वापर करू लागलो आहोत .
आपल्या किचनमध्येच अशा काही वस्तू लपल्या आहेत ज्याचा वापर करून तुम्ही सुंदर स्किन मिळवू शकता
प्रत्येकाच्या किचनमध्ये बेसन तर असतंच हे बेसन पीठ तुमचं सौंदर्य खुलवण्यासाठी खूप फायदेशीर आहे इतकंच नाही तर ,पिंपल ,चट्टे यासारख्या समस्या असतील तर बेसनामध्ये 'या'गोष्टी मिसळून लावल्याने पिंपल आणि डाग दूर होतात. चला तर मग जाणून घेऊया बेसनाचा पॅक चेहऱ्यावर कसा लावता येईल.
बेसन आणि हळदीचा फेसपॅक
चेहऱ्यावर डाग पडले असल्यास किंवा त्वचा निस्तेज दिसत असल्यास. हळद आणि बेसन मिक्स करून पॅक तयार करा. या पॅकमुळे त्वचा चमकदार होईल आणि एक्सट्राऑइल
निघून जाईल.
कसा बनवाल हा पॅक
एक चतुर्थांश चमचा हळद एक चमचा बेसन घ्या. गुलाब पाणी घाला. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा ,पॅक सुकल्यावर चेहरा धुवा आणि मॉइश्चरायझर लावा.
बेसन-मुलतानी मातीचा फेसपॅक
जर तुम्हाला सन टॅनिंगचा त्रास होत असेल तर फक्त बेसनाच्या फेसपॅकनेच यापासून सुटका मिळेल. बेसन आणि मुलतानी मातीचा पॅक बनवा.
कसा बनवाल हा पॅक
बनवण्यासाठी एक चमचा बेसन आणि एक चमचा मुलतानी माती घ्या. गुलाब पाणी घालून दोन्ही मिक्स करून पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावून,सुकल्यानंतर थंड पाण्याने स्वच्छ धुवा.
दही आणि बेसन पॅक
चेहऱ्यावर पिंपलआणि पिंपलचे डाग राहतात. त्यामुळे बेसनामध्ये दही मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावून सुकल्यावर हलक्या हातांनी पाणी लावून घासून घ्या. त्यानंतर चेहरा पाण्याने धुवा.
ड्राय स्किन असेल तर
बेसनासोबत मधाचा फेस पॅक तयार करा. मध त्वचेला मॉइश्चरायझ करण्याचे काम करते.
कसा बनवाल हा पॅक
बेसनाचे पीठ आणि एक चमचा मध मिसळून पेस्ट बनवा. नंतर ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि सुकु द्या. सुकायला लागल्यावर हलक्या हातांनी मसाज करून चेहरा पाण्याने धुवा. मध आणि बेसनाचा फेस पॅक त्वचेला चमक देतो आणि कोरडेपणा दूर करतो.