चहाप्रेमी आता रात्रीही पिऊ शकता चहा, जाणून घ्या `स्लीप टी`चे फायदे
Tea:...हो बरोबर, चहा पिऊन तुम्ही शांत झोपू शकता.
Benefits of Tea: भारतात तुम्हाला हजारो संख्येने चहाप्रेमी (Tea lover) सापडतील. तुमच्या आजूबाजूला घरामध्ये अगदी ऑफिसमध्ये चहाप्रेमी असतात. पण चहा जास्त प्रमाणात पिणं आरोग्यासाठी चांगलं नसतं, असं सांगितलं जातं. त्यात जर तुम्हाला रात्रीसुद्धा चहा प्यायला आवडतं असेल तर तुमची झोप उडते असं म्हणतात. कारण चहामध्ये असणारे काही घटकांमुळे एन्झायटी (Anxiety) वाढते. त्यामुळे रात्री चहा पिऊ नये, असे तज्ज्ञ सांगतात.
पण आता चहाप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. आता तुम्ही रात्रीही बिनधास्त चहा पिऊ शकता. जर तुम्हाला शांत झोप येतं नसेल, वारंवार झोप मोड होतं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आता तुमच्या या समस्येवर रामबाण उपाय सापडला आहे आणि तोही चहाचा...(sleep tea benefits and sleep disorder help sleep tea nm)
हो बरोबर, चहा पिऊन तुम्ही शांत झोपू शकता. मार्केटमध्ये सध्या स्लीप टी (sleep tea ) ही चांगलाच गाजतो आहे. या स्लीप टी पिण्याचे अनेक फायदे (Many benefits of drinking sleep tea) आहेत.
स्लीप टी म्हणजे काय? (What is Sleep Tea?)
स्लीप टी म्हणजे कॅमोमाईल (Chamomile) या फुलापासून तयार केला हर्बल टी (Herbal tea)...स्पॅनिश मँझानिला टी (Spanish Manzanilla Tea) असंही या चहाची ओळख आहे. या चहामध्ये नैसर्गिक स्वरुपातलं कॅफेन (Caffeine) असतं. याशिवाय कार्बोडायड्रेट्स, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फ्लोराईड, फॉलिक अॅसिड आणि व्हिटॅमिन ए असतो.
स्लीप टी असं का म्हणतात? (Why is it called sleep tea?)
- या फुलांमध्ये अनिद्रेचा त्रास दूर करणारे घटक आहेत. त्यामुळे या चहाला स्लीप टी म्हणतात.
- या चहामध्ये अॅपिजेनिन हा घटक आहे. यामुळे आपलं शरीर आणि मन रिलॅक्स होतं.
- स्नायूंचा थकवा घालविण्यासाठी फायदेशी
- रात्री झोपण्याआधी हा चहा घेतल्यास आपल्याला शांत झोप लागते.