Symtoms and Health Issuses and Side Effects Of Sleeping More: सततच्या झोपेमुळं आपल्या शरीरीवर काय परिणाम होतात हे तुम्हाला माहितीये का, आजकाल आपल्या सर्वांच्याच रूटीनचा आपल्या झोपेवर परिणाम होत असतो कारण आपण जास्त वेळ काम करतो आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. त्यामुळे आपण जास्त वेळ झोपतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आणि याचे आपल्या शरीरावरही गंभीर परिणाम होऊ शकतात. तेव्हा समजून घेऊया की नक्की जास्त झोपेचे आपल्या शरीरावर काय परिणाम होऊ शकतात. 


कुठल्याही गोष्टीचा अतिरेक आपल्या शरीरावर गंभीर परिणाम करू शकतो. जशी कमी झोप आपल्या शरीरावर परिणाम करू शकते त्याचप्रमाणे जास्त झोपेचही आपल्या शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतात. झोप अपूरी पडली तर आपला संपुर्ण दिवस खराब जातो. 


त्याचप्रमाणे जास्त झोपेमुळेही तसं होऊ शकतं. समोर आलेल्या माहितीनुसार, जास्त झोपेमुळे आपल्या मेंदूवर परिणाम होऊन आपली स्मरणशक्तीही कमी होऊ शकते. त्याचबरोबर आपल्या उजव्या बाजूच्या मेंदूवरही याचा परिणाम होऊ शकतो.  


जास्त वेळ झोप हा एक प्रकारचा स्लिपिंग डिसॉर्डर आहे. जर तुम्हा जास्त वेळ झोपत असाल तर ही लक्षणं वेळीच ओळखा. 


  • समोर आलेल्या एका माहितीनुसार, दिवसभरात जास्त झोपेमुळे तुम्हांला काही अनुभवांचा विसर पडू शकतो. झोपल्याने आठवणी अधिक चांगल्याप्रमाणे मेंदूमध्ये साठवल्या जातात. मात्र डोक्यातील उजव्या भागामध्ये साठवलेले अनुभव हळूहळू कमी होतात. 

  • केवळ दिवसा नव्हे तर रात्रीची झोपही अतिप्रमाणात घेतल्यास त्याचा मेंदूवर परिणाम होतो. मेंदूमध्ये आठवणींचा कप्पा बदलत असला तरीही त्यासोबत  भीतीदेखील वाढण्याची शक्यता असते. मेंदूच्या डाव्या भागापेक्षा उजव्या भागात आठवणी अधिक प्रमाणात राहतात. दिवसा झोपल्याने मेंदूचा उजवा भाग अधिक प्रभावित होतो. त्यामुळेच या भागात असलेल्या आठवणींवरही परिणाम होतो.  

  • अतिझोपेमुळे लठ्ठपणा वाढतो. त्यातून आपल्या शरीरावर घातकं परिणाम होऊ शकतात. 

  • जास्त झोपेमुळे नैराश्याचा त्रास उद्भवू शकतो. त्याचप्रमाणे मधूमेहाचाही त्रास ओढवू शकतो. 


(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)