Mens Health : मोबाईलचा वाढता वापर आणि त्यामुळं उदभवणारा धोका हे सारं आता सर्वज्ञात आहे. पण, असं असलं तरीही या मोबाईलचा नाद मात्र काही केल्या सुटत नाहीये अशीच परिस्थिती सध्या पाहायला मिळत आहे. मोबाईलमुळं होणाऱ्या याच तोट्यांमध्ये आता आमखी एक धोक्याची सूचना समोर आली आहे. पुरुषांच्या दृष्टीनं हा धोका अधिक मोठा आहे. कारण, मोबाईल सतत पँटच्या खिशात ठेवणं त्यांना महागात पडू शकतं. एका निरिक्षणातून समोर आलेल्या माहितीनुसार पँटच्या खिशात मोबाईल ठेवणाऱ्या पुरुषांच्या आरोग्याचा धोकाच नव्हे, तर त्यांच्यात नपुंसकत्वाचा धोकाही वाढू शकतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फर्टिलिटी एक्सपर्ट्सच्या माहितीनुसार एका दिवसात एक तासाहून अधिक वेळासाठीही मोबाईलचा वापर करणाऱ्य़ा पुरुषांमध्ये स्पर्म काऊंट कमी होत आहे किंवा त्यांच्या स्पर्म क्वालिटीमध्ये बदल होत आहेत.


खिशात अधिक वेळासाठी मोबाईल ठेवल्यामुळे त्या माध्यमातून येणाऱ्या किरणांचा अर्थात रेडिएशनचा शरिरावर वाईट परिणाम होत आहे ही बाब आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी उघडकीस आणली आहे. 


बॅगमध्ये असणाऱ्या मोबाईलपेक्षा खिशात असणाऱ्या मोबाईलमुलं होणारं नुकसान हे दुपटीच्या प्रमाणात वाढत असल्याचं सांगण्यात आलं आहे. व्यक्तीच्या डीएनएसोबतच हृदयावरही याचे थेट परिणाम होत आहेत. पँटच्या खिशात मोबाईल ठेवल्यामुळं रेडिएशन व्यक्तीचे पेल्विक बोन्स कमकुवत करतात.


हाइफामधील  टेक्निकल यूनिवर्सिटीत प्रशिक्षक असणाऱ्या मार्टिन डिर्नफेल्ड यांच्या मते मोबाईलचा अतिवापर करणाऱ्या पुरुषांमध्ये अॅक्टिव्ह स्पर्म आणि त्यांच्या क्वालिटीमध्येही बरीच तफावत दिसून येते. मोबाईल आणि त्यातील इलेक्ट्रोमॅग्नेटीक अॅक्टिव्हीटीमुळं स्पर्म प्रभावित होत आहेत.


यावर उपाय काय?


सेंट जॉर्ज हॉस्पिटलमधील प्रशिक्षक  गेडिस ग्रॉजिंसकस यांच्या मते पुरुषांनी मोबाईलचा अतिवापर टाळावा. मोबाईलच्या नादात ते महत्त्वाच्या गोष्टी गमावतील. जे टाळण्यासाठी ऑफिसवर जाताना- येताना मोबाईल बॅगमध्ये ठेवावा. झोपतानाही मोबाईल काही अंतर दूर ठेवावा. मोबाईल चार्ज करतेवेळी फोनवर बोलण्याची चूक कधीही करु नका.