Fridge Cleaning Tips​:  रेफ्रिजरेटरमधून वास कसा काढावा: फ्रीजशिवाय स्वयंपाकघर आज अपूर्ण आहे. कारण कोणत्याही वस्तू ज्या खराब होऊ शकतात त्या आपण फ्रिजमध्येच ठेवतो. उन्हाळ्यात तर फ्रीज सर्वात जास्त गरजेचा असतो. पण याच फ्रीजची जर योग्य प्रकारण काळजी घेतली नाही. स्वच्छता केली नाही तर त्यामधून दुर्गंध येतो. फ्रीजमधून येणारा हा वास सहन होत नाही. त्यामुळे जाणून घ्या फ्रीज कसा स्वच्छ करावा.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फ्रीजमध्ये अन्न झाकून ठेवल्याने फ्रिजचा वास येऊ लागतो. अनेकदा फ्रिजमध्ये अन्न पडून राहते. कधी कधी भाजीपाला आणि फळे खराब झाल्यामुळे फ्रीजमध्ये वास येऊ लागतो.


- फ्रीजमधील वास दूर करण्यासाठी संत्र्याचा वापर करू शकता. यासाठी तुम्हाला संत्र्याचा रस काढावा लागेल. यानंतर ते पाण्यात मिसळा. त्याने संपूर्ण फ्रिज पुसून काढा. संत्रीच्या ऐवजी पुदीना देखील वापरू शकता.


- फ्रीज स्वच्छ करण्यासाठी तुम्ही कॉफीचा देखील वापर करु शकता. कारण त्याचा वास खूप तीव्र असतो. एका भांड्यात कॉफी बीन्स घेऊन ते फ्रीजमध्ये ठेवा. असे केल्याने तुम्ही फ्रीजमधून येणारा वास दूर करू शकता.