लंडन : आजकालच्या धकाधकीच्या आणि तणावयुक्त जीवनशैलीमुळे धूम्रपान, दारूचे व्यसन अधिकतर लोकांना असते. मात्र या व्यसनामुळे म्हातारपण लवकर येऊ शकतं, असे सिद्ध झाले आहे. 
१९७६ पासून ११५०० हून अधिेक लोकांवर करण्यात आलेल्या संशोधनावरून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. 


वयस्य दिसणाची शक्यता अधिक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्या महिला किंवा पुरूष धूम्रपान, दारूचे व्यसन करतात ते व्यसन न करणाऱ्यांच्या तुलनेत अधिक वयस्य दिसणाची किंवा तशी लक्षणे आढळणाची शक्यता अधिक असते. 
ज्या महिला रोज सुमारे २० सिगरेट ओढतात त्यांना हा धोका ४१% असतो. तर पुरूषांना १२% असतो. 


जर्नल ऑफ एपिडेमोलोजी अॅंड कम्युनिटी हेल्थमध्ये लोकांच्या स्वास्थ्यसंबंधित माहिती घेऊन हा अहवाल करण्यात आला आहे.