Solar Eclipse Effects on Body : सूर्यग्रहण ठराविक वेळेच्या अंतराने होते. त्याचा भौतिक वातावरणावर परिणाम होतो. जेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मधून जातो तेव्हा सूर्यग्रहण होते. त्यामुळे पृथ्वीवर पोहोचणारा सूर्यप्रकाश रोखला जातो. सूर्यग्रहणाच्या वेळी आपण पाहू शकतो की अंधार पडल्यावर प्राणी आणि पक्षी देखील अस्वस्थ होतात. त्याचप्रमाणे, प्रकाशाच्या अनुपस्थितीचा देखील मानवाच्या वर्तनावर आणि हार्मोन्सवर परिणाम होतो. 


वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

14 ऑक्टोबर रोजी या वर्षातील दुसरे आणि शेवटचे सूर्य ग्रहण दिसणार आहे. हे ग्रहण भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजून 34 मिनिटांनी सुरू होईल आणि रात्री 02 वाजून 25 मिनिटांनी संपणार आहे. सूर्यग्रहणाचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतो, ते पाहणार आहोत.


सूर्यग्रहणाचा डोळ्यावर होणारा परिणाम


ऑस्ट्रेलियन रेडिएशन प्रोटेक्शन अँड न्यूक्लियर सेफ्टी एजन्सीच्या मते, सूर्यप्रकाश इतका तेजस्वी आहे की तो थेट पाहणे कठीण आणि अतिशय धोकादायक आहे. प्रखर सूर्यप्रकाशाकडे काही सेकंदही पाहिल्याने रेटिनाला कायमचे नुकसान होऊ शकते. सूर्यग्रहणाच्या वेळी डोळ्यांच्या योग्य संरक्षणाशिवाय सूर्याच्या संपर्कात आल्याने रेटिना जळू शकते. म्हणून सूर्यप्रकाश पाहताना विशिष्ट उपकरणांची मदत घ्यावी. 


प्रोलॅक्टिन हार्मोनची पातळी वाढू शकते 


जर्नल ऑफ फार्मसी अँड बायोअलाईड सायन्समधील अभ्यासात असे दिसून आले आहे की सूर्यग्रहणानंतर लगेचच मानवांमध्ये प्रोलॅक्टिनची पातळी वाढते. प्रोलॅक्टिन हार्मोन चयापचय, रोगप्रतिकारक शक्ती आणि स्वादुपिंड नियंत्रित करते. म्हणून सर्यग्रहणात न खाण्याचा सल्ला दिला जातो. 


पुनरुत्पादक आरोग्य 


जर्नल ऑफ फार्मसी अँड बायोअलाईड सायन्समधील अभ्यासानुसार, ग्रहणाच्या वेळी पृथ्वीवर गुरुत्वाकर्षण शक्तीमध्ये सूक्ष्म बदल होतो. चंद्राच्या गुरुत्वाकर्षणातील बदलांमुळे पृथ्वीच्या महासागरातील भरती-ओहोटी उगवतात आणि पडतात. यामध्ये हार्मोन्स नियंत्रित केले जातात. यामुळे आहार आणि पुनरुत्पादकतेवर परिणाम होताना दिसतो. 


मूड स्विंग्स 


सूर्यग्रहण दरम्यान, चंद्र आणि सूर्य यांचे गुरुत्वाकर्षण खेचते, ज्यामुळे पृथ्वीला एकाच वेळी दोन्हीची एकत्रित शक्ती जाणवते. या असामान्य गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे हार्मोनल आणि वर्तनातील बदल जाणवू शकतात. अशावेळी अनेकदा मूड स्विंग्स होताना दिसतात. 


मेंदूवर होतो परिणाम 


इंडियन जर्नल ऑफ सायकियेट्रीनुसार, सूर्यग्रहणादरम्यान पृथ्वीवर भौतिक बदल होत असतात. अशावेळी वातावरणात विद्युत तणाव वाढू लागतो. या विद्युत ताण-तणावाचा परिणाम मानवी शरीरावर होताना दिसतो. यामुळे मेंदूवर परिणाम होतो?