श्रीमंत व्यक्तीचे खिसे रिकामा करणारा असा `हा` आजार; किंमत ऐकलीत का?
आज आम्ही तुम्हाला अशा एका आजाराबद्दल माहिती देणार आहोत, जो आजार तुमचा खिसा पूर्णपणे रिकामी करू शकतो.
मुंबई : तुम्हाला माहिती असण्याच्या पलिकडेही जगात अनेक आजार आहेत. काही आजार असे आहेत ज्यांची तुम्ही आतापर्यंत नावंही ऐकली नसतील. काही आजार असे असतात जे सहसा रूग्णाची पाठ सोडत नाहीत. अशा आजारपणा रूग्णाचं शारीरिक आणि मानसिकरित्या खच्चीकरण होतंच, शिवाय आर्थिकदृष्ट्याही रूग्ण त्याचं प्रचंड नुकसान होतं. आज आम्ही तुम्हाला अशा एका आजाराबद्दल माहिती देणार आहोत, जो आजार तुमचा खिसा पूर्णपणे रिकामी करू शकतो.
स्पायनल मस्क्युलर अट्रॉफी (Spinal Muscular Atrophy) या आजाराबद्दल फार क्वचित लोकांनी आतापर्यंत ऐकलं असेल. हा जगातील सर्वात महागडा आजार आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. रूग्णाच्या पाठीच्या मकण्यावर या आजाराचा परिणाम होतो. यामध्ये रूग्णाला सर्वप्रथम पाठीच्या मणक्यात वेदना जाणवतात.
एखाद्या रूग्णाला हा आजार जडला की त्याच्या शरीरात स्नायूंच्या वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या प्रोटीनची कमतरता निर्माण होते. यामुळे रूग्णाला हालचाल करणं कठीण असतं. यामध्ये रूग्णाला बसता किंवा उभं राहताना अडचण येते. काही प्रकरणांमध्ये रूग्णाचा पाठीचा कणा वाकडाही होऊ शकतो.
औषधांची किंमत कोटींच्या घरात
मधल्या काळात या आजारावर उपचार नव्हते. मात्र आता विज्ञान विकसित झाल्याने यावरील उपचार आणि औषधांचा शोध लागला आहे. मात्र या आजारांवर उपचार घेण्यासाठी आर्थिक परिस्थिती मजबूत असणं महत्त्वाचं आहे. याचं कारण या आजाराच्या उपचारांसाठी लागणाऱ्या औषधांची किंमत ही कोटींच्या घरात आहे. 18 कोटी रूपये या आजाराच्या उपचारांसाठी लागू शकतात.
या आजारावर जेव्हा उपचार केले जातात तेव्हा झोलगेन्स्मा ( Zolgensma) नावाच्या औषधांची गरज असते. ही एक चिनी थेरपी असून हे औषध या आजाराच्या उपचारासाठी खूप महत्त्वपूर्ण मानलं जातं. हे औषध फार महाग असल्याने सर्वसामान्यांच्या ते अवाक्याबाहेर आहे.