Low BP मुळे झाला श्रीदेवीचा मृत्यू, तुमच्यासोबत असे घडल्यास त्वरीत करा `हे` 5 उपाय
Sridevi Death Mystery : अभिनेत्री श्रीदेवीचा मृत्यू लो बीपीमुळे झाला. अचानक रक्तदाब कमी झाल्यास डोळ्यासमोर अंधारी येतेय. अशावेळी तात्काळ करा 5 घरगुती उपाय.
Home Remedies on Low BP : बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीचा दुबईतील हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू झाला. या घटनेमुळे जगभरात एकच खळबळ उडाली होती. तब्बल 5 वर्षांनंतर श्रीदेवीचे पती बोनी कपूर यांनी मृत्यूचे कारण उघड केले.
श्रीदेवी शरीराची अत्यंत काळजी घेत असे. कायम चांगली दिसण्यासाठी श्रीदेवी डाएट फॉलो करत असे. हा अतिशय स्ट्रिक्ट डाएट असे. अनेकदा श्रीदेवी डाएटकरिता उपाशी देखील राहत असे. या दरम्यानच श्रीदेवीला Low BP चा त्रास देखील सुरू झाला होता. डोळ्यासमोर अंधारी येणे, अचानक भोवळ येणे यासारख्या समस्या जाणवत असे. अचानक Low BP झाल्यावर 5 घरगुती उपाय ठरतील फायदेशीर. Mayo Clinic च्या रिपोर्टनुसार, अशावेळी काय घरगुती उपाय कराल हे समजून घेणे गरजेचे आहे.
बीपी कमी झाल्यास काय कराल?
अचानक लो बीपी झाल्यास चक्कर येऊ शकते. तसेच थकवा यासारख्या समस्या जाणवतात.
हातापायांना मरगळ येऊन ताकद निघून जाणे यासारख्या समस्या जाणवतात. अशावेळी तात्काळ मीठ, साखर पाणी प्यावे.
बीपी लो होता इलेक्ट्रॉल पावडरचे पाणी प्यावे. यामुळे बीपी नॉर्मल होण्याची शक्यता असते.
जर घरी इलेक्ट्रॉल पावडर नसेल तर लिंबू पाणी देखील उपयोगी ठरते. पण बीपीचा त्रास असलेल्या व्यक्तीने घरी ठेवावे इलेक्ट्रॉल पावडर.
ब्लड प्रेशर लो झाल्यावर कॅफिन देखील मदत करते. कॉफीला पाण्यात उकळून प्यावे ज्यामुळे बीपी नॉर्मल होऊ शकते. शक्य असल्यास चहा देखील पिऊ शकतात.
डाएटची घ्या काळजी
कमी रक्तदाबाचा त्रास असलेल्या व्यक्तीने आपल्या डाएटची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. या लोकांनी उपवास करणे सहसा टाळावे अन्यथा फार काळ उपाशी राहू नये. लो बीपी सांभाळणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश करावा. जसे की, केळ, मखाना, पपई, मुळा, पालक यासारखे पदार्थ खावेत.
मीठ
अति मीठ शरीरासाठी घातक असले तरीही लो बीपीचा त्रास असणाऱ्या व्यक्तीने मीठाचा समावेश आहारात आवर्जून करावा. व्यायाम करताना एनर्जी मेंटेन ठेवण्यासाठी लिंबू पाणी प्यावे.
कोमट पाणी
कोमट पाण्याने देखील लो बीपीचा त्रास कमी होतो. त्यामुळे थोडा थकवा जाणवला तर कोमट पाणी प्यावे. कोमट पाणी आरोग्यासाठी देखील चांगले असते.
गरम दूध
अचानक शरीरातील रक्तदाब कमी झाला तर गरम दूध देखील याचा त्रास कमी करण्यासाठी मदत करते. लो बीपीचा त्रास जाणवलास गरम दूध प्यावे. गरम पाणी आणि गरम दूध शरीरासाठी चांगलेच असते.
बीपी कमी होण्याचे कारण
चुकीची लाईफस्टाईल
प्रॉसेस्ड फूड आणि फास्ट फूडचे अधिक सेवन
जेनेटिक हायपरटेंशन
जास्त स्मोकिंग
जास्त मद्यप्राशन करणे