डॉक्टर होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारची हेल्पलाईन
सप्टेंबरमध्ये तामिळनाडूमध्ये दोन नीट देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली.
तामिळनाडू : सप्टेंबरमध्ये तामिळनाडूमध्ये दोन नीट देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. या आत्महत्येनंतर राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी नीटच्या देणाऱ्या भावनिक आणि पर्सनल मदतीसाठी एक हेल्पलाइन सुरू केली आहे.
आरोग्यमंत्री सुब्रमण्यम म्हणाले की, 330 विद्यार्थ्यांना कॉल करण्यासाठी किंवा येणाऱ्या कॉलमध्ये उपस्थित राहण्यासाठी आणि मदत करण्यासाठी नियुक्त केलं गेलं आहे. यावर्षी NEET मध्ये राज्यात एकूण 1.12 लाख विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे.
आरोग्य मंत्री म्हणाले की, आम्हाला राष्ट्रीय चाचणी एजन्सीकडून संपर्क तपशील प्राप्त होतील, जे नंतर प्रत्येक जिल्हा हेल्पलाइन केंद्रात सामायिक केले जातील. जिथे व्यावसायिक प्रत्येक विद्यार्थ्याशी संवाद साधतील आणि काही मदत हवी असल्यास आम्ही देऊ.
सरकारने केवळ चेन्नईसाठी 40 मानसोपचारतज्ज्ञ आणि मानसशास्त्रज्ञांची नेमणूक केली आहे. यांच्या माध्यमातून 104 टोल फ्री क्रमांकावर कॉल करून विद्यार्थ्यांना मदत मिळू शकते. या वर्षी तामिळनाडूमध्ये NEET शी संबंधित तीन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची तक्रार आहे.
मुख्यमंत्री एमके स्टालिन, विरोधी पक्षाचे नेते एडापडी के पलानीसामी आणि इतर अनेक नेत्यांनी विद्यार्थ्यांना घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नये आणि व्यावसायिकांची मदत घ्यावी असं आवाहन केलं आहे.
2021 मध्ये NEET परीक्षा देणाऱ्या तिसऱ्या विद्यार्थ्याच्या आत्महत्येने संपूर्ण सिस्टिम हादरली आहे. वेल्लोरमध्ये सेनूर थलैयारामपट्टीमधून एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची बातमी आहे. तर रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांच्या 17 वर्षांच्या मुलीने आत्महत्या केली होती. तिचे वडील तिरुनावुकरासू म्हणाले की, ती डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहत होती.