नवी दिल्ली : सरकारने दर निश्चिती करूनही हार्ट अॅटॅक पेशंटसोबत हॉस्पिटलकडून फसवणूक होत आहे. अद्यापही स्टेंटच्या किमती गगनालाच भिडलेल्या असून, या किमती सरकारने निश्चित केलेल्या दरापेक्षा बेकायदेशीर रित्या फुगवून सांगितल्या जात आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्टेंट प्रोसीजरच्या नावाखाली हॉस्पिटल्स पेशंट कडून पैसे उकळत आहेत. हार्ट अॅटेक असलेल्या पेशंटना अल्पदरात उपचार घेणे शक्य व्हावे यासाठी केंद्र सरकारने स्टेंटच्या किमतींवर कॅपींग (फिक्स रेट) लावण्याचा निर्णय घेतला. पण, अद्यापही चित्र जैसे थेच आहे. मुंबई, दिल्लीसारख्या राजधानीच्या शहरांमध्येही बडी हॉस्पिटल्स पेशंटला स्टेंट बसविण्साठी तब्बल अडीच ते तीन लाख रूपयांपर्यंत दर आकारताना दिसत आहेत.


सरकारी निर्णयानुसार स्टेंटची रक्कम न वाढवता कन्सलटन्सीची फी वाढविण्याची पळवाट डॉक्टर मंडळींनी शोधली आहे. अॅजिओप्लास्टीवर यापूर्वी फारसे शुल्क आकारले जात नसे. पण, आता छुप्या खर्चात याचाही समावेश डॉक्टर्स मंडळी करू लागली आहेत. त्यामुळे सरकारने कायदे केले तरी, पेशंटना मात्र काहीच फायदा होताना दिसत नाही.