मुंबई : बाहेरचे जंक फूड खाल्ल्याने शरीराच्या पाचनक्रियेवर मोठा परिणाम होत. पोटात गडबड झाल्यास त्यावर बडिशेप, आलं, दही, पपई खाल्ल्याने पाचनक्रिया सुरळीत होते. उन्हाळा सुरु झाला की पोटाच्या समस्या डोके वर काढतात. त्यामुळे उन्हाळ्यात खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असते. उन्हाळ्यात पचण्यास हलके, अधिक तिखट नसलेले पदार्थ खाण्यावर भर द्यावा. तसेच पाणी उकळून वा गाळून प्यावे. 


पोटात गडबड झाल्यास काही सोपे घरगुती उपाय


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आल्याच्या सेवनाने पोटाच्या समस्या दूर होतात तसेच पाचनक्रियेस मदत मिळते. आले खाल्ल्याने छातीत जळजळ होत नाही. जेवणानंतर आले आणि लिंबूच्या रसाचे काही थेंब एकत्रित घेतल्यानं अनेक समस्या दूर होतात. 


बडिशेपमधील घटक गॅस कमी करण्यासाठी तसेच पाचनक्रिया सुधारण्यात मदत करतात. बडिशेप खाल्ल्याने वा चहामध्ये टाकून प्यायल्याने पाचनक्रिया सुधारते. यामुळे छातीत जळजळ तसेच पोट आणि आतड्यांच्या समस्या दूर होतात.


जिराच्या सेवनानेही फायदा होतो. यात अनेक पोषकतत्वे असतात. जिरे तुम्ही भाजून दही, सरबत, सॅलड अथवा सूपमध्ये टाकून पिऊ शकता. 


पोटाच्या विकारांवर अनेकदा दही उपयोगी ठरते. यातील प्रोबायोटिक पोटाचे विकार दूर करण्यास मदत करतात. 


पपई डायरिया आणि पोटाच्या अन्य विकारांवर गुणकारी ठरते. पपई खाल्ल्याने पाचन, आंबट ढेकर, बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. याच्या सेवनाने पोटाचे विकार दूर होतात. 


केळे असे फळ आहे जे लवकर पचते. तसेच लगेच एनर्जी मिळते. पपईप्रमाणेच यात पेक्टिन असते जे पोटाचे विकार दूर करते.