मुंबई : अमेरिकेतील इंडियानामधून एक चक्रावून सोडणारा प्रकार समोर आला आहे. एका महिलेने नवजात बाळाला जन्म दिला आहे. दरम्यान या बाळाचे स्तन महिलांसारखे असल्याचं लक्षात आलंय. इतकंच नव्हे तर या बाळाच्या स्तनातून दूधही येतं असल्याचा प्रकार घडलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या या बाळाची चर्चा मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर होताना दिसतेय. यानंतर लक्षात आलं की, या एका आठवड्याच्या बाळाला दुर्मिळ आजाराने ग्रासलं असल्याचं समोर आलं.


द सनमध्ये दिलेल्या रिपोर्टनुसार, या बाळाची आई वानेसा मोरान यांनी जेव्हा बाळाच्या स्तनातून दूध येत असल्याचा प्रकार पाहिला त्यावेळी तिला धक्का बसला. या घडलेल्या प्रकारामुळे ती घाबरून गेली. त्यानंतर ती तातडीने बाळाला घेऊन डॉक्टरांकडे जाण्याचा निर्णय घेतला.


डॉक्टरांनी या बाळाची तपासणी केली. डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे, या नवजात बाळाला Neonatal Galactorrhea नावाचा दुर्मिळ आजार आहे. हा आजार जगभरात केवळ 2 टक्के बाळांना होतो. यामध्ये स्तनांमधून दूध येण्याची समस्या मुलगा किंवा मुलगी अशा दोन्ही बाळांमध्ये दिसू शकते. 



तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, नवजात बाळांना ही समस्या प्रेग्नेंसीमध्ये आईच्या शरीरात Oestrogenची मात्रा जास्त झाल्यामुळे होऊ शकते. Oestrogen आईच्या शरीरातून नवजात बालकात Placentaमध्ये जाऊन Placentaद्वारे होत रक्तातून पोहोचतं. यामुळे बाळाचे स्तनांचा आकार वाढून त्यातून दूध येऊ लागतं. 


या बाळाची आई वानेसाने सांगितलं की, बाळाच्या जन्माच्या वेळी पाहिलं तेव्हा त्याचे स्तन आतील बाजूला दुमड्याप्रमाणे दिसत होते. त्यानंतर एका आठवड्यात त्याच्या स्तनांचा आकार मोठा झाला आणि त्यातून दूध येत असल्याचं लक्षात आलं.