पुरुषांच्या तुलनेत ऑफिसात जाणाऱ्या महिलांना अधिक तणाव
ऑफिसात जाणाऱ्या महिलांना पुरुषांच्या तुलनेत अधिक ताण असतो असे एका संशोधनातून समोर आलेय. अधिक तणावामुळे डिप्रेशनचा धोकाही पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये अधिक असतो.
नवी दिल्ली : ऑफिसात जाणाऱ्या महिलांना पुरुषांच्या तुलनेत अधिक ताण असतो असे एका संशोधनातून समोर आलेय. अधिक तणावामुळे डिप्रेशनचा धोकाही पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये अधिक असतो.
अमेरिकेतील युनिर्व्हसिटी ऑफ इलिनियॉसमधील संशोधकांनी हे मत मांडलेय. संशोधनादरम्यान ज्या महिलांना अधिक पगार असतो त्यांच्यामध्ये तणावाचे प्रमाण अधिक असल्याचेही आढळले.
संशोधनानुसार, घरात सर्वाधिक आर्थिक मदत कोण करतं याचा त्या व्यक्तीच्या मनोविज्ञानावरही परिणाम होतो. कुटुंबातील इतर सदस्यांच्या तुलनेत महिलांचे इनकम वाढल्यास त्यांच्यात डिप्रेशनची लक्षणे दिसू लागतात.
दुसरीकडे मात्र पुरुषांमध्ये याउलट स्थिती असते. पुरुषांच्या पगारातमध्ये जसजशी वाढ होते तसतसे त्यांची जीवनशैलीच सुधारत नाही तर त्यांच्या मानसिक आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होतो.
संशोधनाकांनी केलेल्या या संशोधनात १४६३ पुरुष आणि १७६९ महिलांचा समावेश करण्यात आला. यावेळी त्यांच्या मानसिक आरोग्याची तपासणी करण्यात आली.