कोरोनाची वाढती आकडेवारी पाहता केंद्र सरकारकडून राज्यांना कठोर आदेश
कोरोनाची वाढती रूग्णसंख्या वेळेतच रोखण्यासाठी केंद्र सरकारने आता पावलं उचलायला सुरुवात केली आहे.
दिल्ली : देशात पुन्हा एकदा कोरोनाचे रूग्ण वाढताना दिसतायत. वाढती रूग्णसंख्या वेळेतच रोखण्यासाठी केंद्र सरकारने आता पावलं उचलायला सुरुवात केली आहे. यासाठीच बुधवारी केंद्रीय आरोग्य सचिवांनी सर्व राज्यांना पत्र लिहून सांगितलं की, राज्य सरकारांनी मेडिकल ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यासाठी गरजेची असणारी सर्व तयार करावी.
ऑक्सिजनचा साठा करून ठेवण्याच्या सूचना
सर्व राज्यांनी मेडिकल ऑक्सिजनचा पुरेसा बफर स्टॉक ठेवावा, अशा सूचना केंद्राने राज्यांना दिल्या आहेत. याशिवाय रुग्णांच्या काळजीसाठी सर्व आरोग्य सुविधा उपलब्ध करून ठेवण्यास सांगण्यात आलं आहे.
48 तासांसाठी ऑक्सिजनचा साठा आवश्यक
केंद्रीय आरोग्य सचिवांनी सांगितलं की, राज्य सरकारांनी ऑक्सिजन थेरपीमध्ये किमान 48 तास पुरेसा मेडिकल ऑक्सिजनचा बफर स्टॉक ठेवावा. त्यामध्ये लिक्विड मेडिकल ऑक्सिजनची उपलब्धता असेल याकडे लक्ष ठेवावं. याशिवाय, आरोग्य सुविधांसाठी ऑक्सिजनची टाकी पुरेशा प्रमाणात भरली गेल्या पाहिजे.
ऑक्सिजन सिलिंडरची यादी तयार करा
ऑक्सिजन सिलिंडरची यादी तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. या यादीमध्ये बॅकअप स्टॉक आणि रिफिलिंगसह ऑक्सिजन सिलिंडरची नोंद असावी, असं नमूद केलं आहे. यासोबतच हे सिलिंडर भरून तयार आहेत याची खात्री करण्यात यावी.
कोरोनाच्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, राज्यांमध्ये लाइफ सपोर्ट उपकरणांची पुरेशी उपलब्धता असावी, असं केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं आहे.