अपघातानंतर `या` रक्तगटाच्या रूग्णाचा मृत्यू होण्याचं प्रमाण अधिक, संशोधनात खुलासा
O रक्तगटच्या लोकांना जागतिक दाता म्हणून ओळखले जाते. परंतू या रक्तगटाच्या रूग्णांसाठी आता एक महत्त्वाची गोष्टी संशोधनातून समोर आली आहे. अपघातानंतर ओ रक्तगटाच्या रूग्णांमध्ये मृत्यूचं प्रमाण अधिक असतं असे संशोधनातून समोर आलं आहे.
अमेरिका : O रक्तगटच्या लोकांना जागतिक दाता म्हणून ओळखले जाते. परंतू या रक्तगटाच्या रूग्णांसाठी आता एक महत्त्वाची गोष्टी संशोधनातून समोर आली आहे. अपघातानंतर ओ रक्तगटाच्या रूग्णांमध्ये मृत्यूचं प्रमाण अधिक असतं असे संशोधनातून समोर आलं आहे.
बायोमेड सेट्रलच्या संशोधन अहवालामध्ये ओ रक्तगटाच्या रूग्णांमध्ये मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याची बाब उघडकीस आली आहे. सुमारे 901 जॅपनीज आपत्कालीन रूग्णांमधून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
काय आहे अहवाल ?
संशोधनातून समोर आलेल्या अहवालामध्ये गंभीर अपघातामध्ये ओ पॉझिटीव्ह रूग्णांमध्ये अपघातानंतर अपंगत्व येण्याची किंवा मृत्यूची शक्यता दाट असते. यामध्ये इतर रक्तगटाच्या रूग्णांच्या तुलनेत ओ रक्तगटातील रूग्णांमध्ये मृत्यूचे प्रमाण 28 % अधिक आहे.
का आहे मृत्यूचे कारण ?
अपघातानंतर मृत्यू होण्यामागे अति रक्तस्त्राव होणं हे एक महत्त्वाचं कारण मानल जातं. इतर रक्तगटाच्या तुलनेत ओ रक्तगटाच्या रूग्णांमध्ये ब्ल्ड क्लॉटिंग घटक कमी असतात. 'या' रक्तगटाच्या रुग्णांंना हार्टअटॅकचा धोका कमी , संशोधकांंचा नवा खुलासा