मुंबई : आजकाल तणावग्रस्त जीवनशैली हा आपल्या जीवनाचा एक भागच झाला आहे. यामध्ये अनेक  विद्यार्थ्यांना रात्री जागून अभ्यास करण्याची सवय असते तर पुढे आयुष्यात करियरचा भाग म्हणून अनेकांना रात्रपाळीमध्ये काम करावे लागते. पण अशा जीवनशैलीची स्वतःहून निवड केलेली असली तरीही त्याचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो हे तुम्हांला ठाऊक आहे का ?


जागरणाचा आरोग्यावर होतो परिणाम 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जागरण कळत- नकळत केले तरीही यामुळे आरोग्य बिघडते. मात्र स्वीडनच्या कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूटने केलेल्या एका संशोधनानुसार तुमची कामाच्या दिवसांमध्ये पुरेशी झोप होत नसल्यास विकेंडला म्हणजेच सुट्टीच्या दिवशी अपुरी राहिलेली झोप पूर्ण करा. यामुळे मृत्यूदर कमी झाल्याचा दावा संशोधनाच्या निष्कर्षामध्ये करण्यात आला आहे.  'या' उपायाने मिनिटाभरात झोपी जाण्यासाठी मेंदुला द्या संकेत !


काय आहे दावा ? 


स्वीडनच्या कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूट  गेली 13 वर्ष 43 हजाराहून अधिक लोकांच्या झोपेचा अभ्यास करत आहे. या अभ्यासात अनेक वयोगटाच्या रूग्णांचा समावेश करण्यात आला होता. संशोधनाच्या निष्कर्षानुसार, रात्री 7 तास झोपणार्‍यांच्या तुलनेत 5 तासांपेक्षा कमी वेळ झोपणार्‍या आणि  व्यक्तींमध्ये मृत्यू होण्याचे प्रमाण 65 % अधिक आहे. म्हणजेच तुम्हांला कामाच्या दिवसांमध्ये रात्री पुरेशी झोप मिळत नसल्यास विकेंडला थोडा अधिक आराम करा. मात्र हा उपाय काही प्रमाणातच आरोग्यावर होणारा परिणाम कमी करण्यास मदत करू शकतो. ... म्हणून उन्हाळ्याच्या दिवसात रात्री झोपण्यापूर्वी आंघोळ करा