निपाह विषाणुपासून वाचण्यासाठी अशी घ्याल काळजी
केरळमध्ये पुन्हा एकदा निपाह विषाणूचा धोका निर्माण झाला आहे.
नवी दिल्ली : केरळमध्ये पुन्हा एकदा निपाह विषाणूचा धोका निर्माण झाला आहे. एर्नाकुलम येथे राहणाऱ्या २३ वर्षीय तरूणला निपाह विषाणूची बाधा झाल्याचे वैद्यकीय तपासणीतून समोर आल्यामुळे केरळमध्ये पुन्हा निपाह विषाणू पसरल्यामुळे लोक फळे आणि भाज्या खाण्यात संकोच व्यक्त करत आहेत. मुख्य म्हणजे उन्हाळ्यात पिकणारे फळे आणि फळाचा राजा आंबा खरेदी करण्यासाठी लोक विचार करत आहेत.
खजूर आणि आंब्यापासून राहा सावध
केरळमधून खजूर आणि आंबा मोठ्या प्रमाणात निर्यात केला जातो. फक्त भारत देशात नाही तर इतर देशांमध्ये देखील खजूर आणि आंबा निर्यात केला जातो. खजूर या फळामध्ये निपाह विषाणू पसरल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानंतर आंबा आणि केळा या फळांच्या माध्यमातून विषाणूबाधा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे फळे खाण्याआधी ते स्वच्छ पाण्यात धुवून घ्या.
निपाह व्हायरस काय आहे?
- निपाह विषाणुची निर्मिती अत्यंत सहज होते.
- निपाह विषाणू वटवाघुळामध्ये आढळून येतो.
- १९९८ मध्ये मलेशियाच्या कम्पंग सुंगाई निपाहमधून या विषाणुचा शोध लागला होता.
- २००४ मध्ये बांग्लादेशातून काही लोकांना या विषाणुची बाधा झाली होती.
काय आहेत लक्षणं?
- ३ ते १४ दिवसांपर्यंत ताप आणि डोकेदुखी.
- २४-४८ तासांत व्यक्ती कोमात जाते.
- संसर्गाच्या सुरुवातीच्या काळात श्वास घेण्यासही त्रास होतो.
- न्यूरोलॉजिकल समस्या निर्माण होते.
- अंगदुखी.
काय काळजी घ्याल?
- झाडावरुन पडलेली आणि खूप पिकलेली फळे खावू नका.
- या विषाणुने पिडीत व्यक्तींच्या जवळ जावू नका.
- खूप ताप येत असल्यास डॉक्टरांची भेट घ्या.
गत वर्षी या विषाणूच्या संसर्गामुळे तब्बल १७ जण मृत्यू मुखी पडले होते. खजूर फळाच्या माध्यमातून निपाह विषाणू संपूर्ण भारत देशात पसरला होता. खजूर पिकाची शेती करणाऱ्यांना या विषाणूचा संसर्ग लवकर होण्याची शक्यता आहे.
- खूप ताप येत असल्यास डॉक्टरांची भेट घ्या.
गत वर्षी या विषाणूच्या संसर्गामुळे तब्बल १७ जण मृत्यू मुखी पडले होते. खजूर फळाच्या माध्यमातून निपाह विषाणू संपूर्ण भारत देशात पसरला होता. खजूर पिकाची शेती करणाऱ्यांना या विषाणूचा संसर्ग लवकर होण्याची शक्यता आहे.