मुंबई : ऱसदार फळे, भाज्या आणि दहीसारखे पदार्थ खाल्ल्याने डिहायड्रेशन, त्वचेतील ओलावा कमी होणे तसेच व्हिटामिन्स आणि खनिजांची कमतरता यासारख्या समस्या दूर होतात. उन्हाळ्यात अशा भाज्या खाल्ल्या पाहिजे ज्यामुळे तुम्ही उन्हाळ्यातही फिट राहू शकता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


टोमॅटो - टोमॅटोमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटामिन्स सी भरपूर प्रमाणात असते. यात लायकोपिन नावाचे फायटोकेमिकल्सही असते ज्यामुळे जुने आजार खासकरुन कॅन्सर ठीक होण्यास मदत होते. 



झुकिनी - झुकिनीमध्ये पेक्टिन नावाचे फायबर असते ज्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते तसेच कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. 



कलिंगड - कलिंगडामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचे प्रमाण असते. पाण्याचे प्रमाण अधिक असल्याने हे खाल्ल्यावर लगेचच पोट भरते. या लायकोपिनही असते.



संत्रे - संत्र्यामध्ये पोटॅशियम मोठ्या प्रमाणात आढळते. यातील पोषक तत्वे उन्हाळ्यात शरीरासाठी महत्त्वाची असतात. यात ८० टक्के पाणी असते. 



दही - दह्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन असते. ज्याचा आरोग्याला मोठा फायदा होतो. यातील प्रोटीनमुळे भूक शांत राहते. दह्याच्या सेवनाने पाचनक्रिया सुरळीत राहण्यास मदत होते.



लिंबू-पुदिन्याचे पाणी - लिंबू आणि पुदिन्याचे पाणी एकत्रितरित्या घेतल्यास आरोग्यास मोठा फायदा होतो. यामुळे लिव्हर साफ होते तसेच मेटाबॉलिजम मजबूत होण्यास मदत होते.