मुंबई : एक अजब प्रकार समोर आला आहे. एक गर्भवती महिला गर्भवती असूनही पुन्हा एकदा गर्भवती राहिली आहे. या महिलेने दोन्ही बाळांना जन्म दिलाय. पण दोन्ही बाळं ट्विन्स नाहीत. हा सगळा प्रकार चक्रावणारा असला तरीही सायन्समध्ये याला Superfetation असं संबोधण्यात येतं. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेबेका रॉबर्ट्स ही अगोदर गर्भवती होती. तिच्या गर्भात मुलगा नोहा होता. असं असताना पुन्हा एकदा ती मुलगी रोसाली हिच्याबरोबर गर्भवती झाली. सध्या या Superfetation ची जोरदार चर्चा रंगली आहे. 



मिळालेल्या माहितीनुसार जगभरात 0.3% महिलांसोबत असा प्रकार घडतो. पण अनेक केसेसमध्ये दुसऱ्या बाळाचा गरोदरपणातच मृत्यू होतो. पण रेबेकाच्या बाबतीत वेगळंच घडलं. तिची दोन्ही बाळं सुखरूप आहेत. 



रेबेकाकडे तिच्या दोन्ही बाळांच्या जन्माचा आनंद व्यक्त करण्याचं कारण आहे. कारण तिने दोन्ही बाळांना सुखरूप जन्म दिला आहे. नोहा आणि रोसालिया यांना जुळं म्हटलं तरी चालेल पण त्यांच्या तीन आठवड्यांचा फरत आहे. 



मिळालेल्या रिपोर्टनुसार, रेबेका आणि तिचा पार्टनर हे असेल पालक आहेत. ज्यांनी आपल्या दोन्ही मुलांच Superfetation द्वारे स्वागत केले आहे. नोहा आणि रोसालिचा जन्म 17 सप्टेंबरला रॉयल युनायटेड रुग्णालयात झाला. रोसालिया ही नोहापेक्षा लहान आहे. तिला 95 दिवस रुग्णालयात ठेवून उपचार करण्यात आले.