पुरूषांना फीट ठेवतील ही `७` सुपरफूड्स...
असं म्हटलं जातं की जथा अन्नम् तथा मनम्...
मुंबई : असं म्हटलं जातं की जथा अन्नम् तथा मनम्... म्हणजे जसे अन्न तुम्ही घेता तसे तुम्ही होता. म्हणजे तुमचे शरीर आणि मन अन्नानुसार घडत जाते. परंतु, हार्मोन्स, शरीराची रचना. मेटॅबॉलिझम हे काही घटक वेगळे असल्याने स्त्री-पुरुषांची अन्नाची गरज देखील वेगळी असते. पुरुषांच्या हेल्थ आणि फिटनेसचा विचार करता त्यांना काही विशेष पदार्थांची गरज असते. मग जाणून घ्या पुरुषांसाठी असलेले सुपरफूड्स...
ओट्स:
सकाळी नाश्त्याला बाऊलभर दुधात ओट्स घालून घ्या. त्यामुळे दिवसाची चांगली सुरवात होईल. त्यात अधिक प्रमाणात फायबर्स असल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते. त्यामुळे हृदयाचे आरोग्य राखले जाते. तसंच ओट्समध्ये असलेल्या प्रोटीनच्या अधिक प्रमाणामुळे ऊर्जा मिळते आणि दुपारच्या जेवणापर्यंत स्टॅमिना राखला जातो.
अंड:
यात असलेल्या प्रोटीनच्या मुबलक प्रमाणामुळे मसल्स बिल्डिंगला मदत होते. तसंच अंड हा व्हिटॅमिन बी १२ चा उत्तम स्त्रोत असल्याने रेड ब्लड सेल्सच्या निर्मितीस मदत होते. अंड्यातील Choline आणि व्हिटॅमिन डी मुळे हाडांना बळकटी येते व स्मरणशक्ती सुधारते.
बदाम:
दररोज मूठभर बदाम खाल्यास पुरुषांमधील LDL कोलेस्ट्रॉलची पातळी ३% ने कमी होते. तसंच त्यात मुबलक प्रमाणात फायबर्स आणि हेल्दी फॅट्स असल्याने कॅल्शियमचा पचनक्रिया आणि हाडांचे आरोग्य सुधारण्यासाठी उपयोग केला जातो.
टोमॅटो:
टोमॅटोमध्ये lycopene हे अँटिऑक्सिडंट अधिक प्रमाणात असल्याने टोमॅटोला लाल रंग येतो. याव्यतिरिक्त टोमॅटो हे व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियमचा उत्तम स्त्रोत असल्याने आर्टरीजचे आरोग्य राखणे जाते आणि प्रोस्टेट ग्लॅन्डचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.
पालक:
फायबर, कॅल्शियम आणि बीटा कॅरोटीन हे पोषकतत्त्व भरपूर असलेला पालक दृष्टी आणि इम्म्युनिटी सुधारण्यासाठी उत्तम आहे. याव्यतिरिक्त यात असलेले अँटिऑक्सिडंटमध्ये कॅन्सरला मात करण्याचे गुणधर्म असतात. तर व्हिटॅमिन सी आणि बीटा कॅरोटीन कोलेस्ट्रॉल कमी करून हृदयाचे आरोग्य सुधारण्यास आणि oxidative स्ट्रेस कमी करण्यास फायदेशीर ठरतात.
कडधान्य:
फायबर आणि प्रोटीनचा उत्तम स्त्रोत असलेले कडधान्य आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.
सोयाबीन:
यात आवश्यक पोषकघटक आणि मिनरल्स असतात. तसंच फायबर, प्रोटीन, अँटिऑक्सिडंट, व्हिटॅमिन्स, मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात.