तुम्हालाही दिसतायत ही लक्षणं; अजिबात दुर्लक्ष करू नका, असू शकतो `Swine flu`
Swine flu ची लक्षणं कोणती? या व्यक्तींना सर्वात जास्त धोका?
मुंबई : राज्यात कोरोना पाठोपाठ आता स्वाईन फ्लूचं संकट वाढत आहे. नागपूरमध्ये स्वाईन फ्लूचे रुग्ण वाढत आहेत. सध्या व्हायरल ताप, सर्दी, खोकला या रोगाची साथ आहे. पण त्यासोबत मलेरिया डेंग्यू आणि स्वाईन फ्लूचं संकट देखील आहे. त्यामुळे कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करणं धोक्याचं ठरू शकतं.
तुम्हाला जर ही लक्षणं दिसत असतील तर तुम्ही तातडीनं डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. याचं कारण ही स्वाईन फ्लूची लक्षणं आहेत. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करू नका. यासोबत काही लोकांनी हा आजार टाळण्यासाठी विशेष काळजी घ्यायला हवी.
काय आहेत लक्षणं?
सर्दी , खोकला, ताप ही स्वाईन फ्लूची प्राथमिक लक्षणं आहेत. थंडी वाजून ताप येणं हा ताप साधारण 100 पेक्षा जास्त असतो. सर्दी, खोकला, घसादुखी, अंगदुखी, पोटदुखी, मळमळ, उलटी, जुलाब आणि कधी कधी पोटदुखी किंवा मळमळ या लक्षणांचा समावेश आहे. नागरिकांनी सर्दी, खोकला, ताप यासरखे आजर झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.
या व्यक्तींनी जास्त काळजी घ्यावी
अस्थमा किंवा दमा असणाऱ्या व्यक्तींना जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. गर्भवती महिला, मधुमेह, कर्करोग तसेच एचआयव्ही ग्रस्त रुग्णांना स्वाईन फ्लूचा धोका जास्त आहे. अशा रुग्णांनी वर्षातून एकदा स्वाईन फ्लूची लस घेणे आवश्यक आहे.
तापमानातील अनपेक्षीत बदल हे स्वाईन फ्लूच्या विषाणूंसाठी पोषक ठरू शकतात. अशा वेळी या विषाणूंची लागण होऊ नये, याची काळजी घ्यावी. या रोगाची लागण आणि संसर्ग होऊ नये यासाठी मास्कचा वापर करावा.
सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही वस्तूला हात लावल्यानंतर सॅनिटायझरचा वापर गरजेचा आहे. शक्य असेल तर साबणाने किंवा हॅण्डवॉशने हात धुवावेत. तुळशीची पानं, चहाची पात याचा वापर चहासाठी करावा. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.