मूळव्याधीच्या या `5` लक्षणांंकडे दुर्लक्ष नकोच !
मूळव्याधीचा त्रास हा अत्यंत वेदनादायी आहे.
मुंबई : मूळव्याधीचा त्रास हा अत्यंत वेदनादायी आहे. या समस्येबाबत फार खुलेपणाने बोलले जात नसल्याने अनेकजण मूळव्याधीचा त्रास सहन करतात. मात्र यामुळे ही समस्या अधिक गंभीर होते. कालांतराने मूळव्याधीच्या वेदनादायी समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी शस्त्रक्रियेची मदत घ्यावी लागते. म्हणूनच हा त्रास अत्यंत गंभीर होऊ नये म्हणून सुरुवातीच्या टप्प्यावरच या आजाराकडे लक्ष देणं गरजेचे आहे. मूळव्याधीच्या समस्येवर जादुई ठरतील हे '8' घरगुती
मूळव्याधीची लक्षणं कोणती ?
खाज येणे - गुद्द्वाराजवळ खाज येणे हे मूळव्याधीतील एक प्रमुख लक्षण आहे. त्यामागील निदान करण्यासाठी अॅनल पॅथोलॉजी करावी. हा त्रास कमी न झाल्यास त्वचेवर इंफेक्शन पसरण्याची शक्यता असते.
वेदना जाणावणे - वैद्यकीय सल्ल्यानुसार, शौचाच्या ठिकाणी वेदना किंवा त्रास जाणवणे हे मूळव्याधीचे लक्षण आहे. कोलनोस्कॉपी किंवा एमआयआर सारख्या निदान पद्धतीतून त्याचे योग्यपद्धतीने निदान होऊ शकत नाही. त्यामुळे गुद्द्वाराजवळ तीव्र वेदना जाणवत असल्यास गॅस्ट्रोइंटरोलॉजिस्टचा सल्ला घ्यावा. काही लोकांना फिशरच्या त्रासामध्येही वेदना जाणवू शकतात.
सूज, गाठ - अनेकांना गुद्द्वाराजवळ गाठ किंवा सूज आढळत असल्यास त्याकडे लक्ष द्यावे. कॅन्सरची गाठ गुद्द्वाराजवळ आढळण्याची वेळ फारशी येत नाही. मात्र मूळव्याधीमध्ये हे लक्षण आढळून येते.मूळव्याधीचा त्रास 7 दिवसात दूर करणारे घरगुती मलम
शौचाच्यावेळी वेदना - मूळव्याधीच्या त्रासामध्ये गुद्द्वाराजवळील रक्तवाहिन्यांवर दाब आल्याने मलविसर्जनाच्या वेळेस रक्त पडते. सोबतच वेदना जाणवतात. त्यामुळे बद्धकोष्ठता किंवा आयबीएसच्या त्रासापेक्षा मूळव्याध अधिक तीव्र असतो. यामध्ये पोटाच्या खालच्या बाजूला वेदना होतात.
शौचातून रक्त पडणे - पोटाच्या कॅन्सरपासून ते मूळव्याधीपर्यंत रक्त पडणे हे लक्षण आढळून येते. त्यामुळे तुम्हांला हे लक्षण आढळल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मूळव्याध किंवा इतर कोणत्या नेमक्या आजारामुळे हा त्रास होत आहे हे वेळीच समजणं गरजेचे आहे. मूळव्याधीमध्ये रक्त पडण्याच्या समस्येवर फायदेशीर 'हा' घरगुती उपाय