मूळव्याधीमध्ये रक्त पडण्याच्या समस्येवर फायदेशीर 'हा' घरगुती उपाय

मूळव्याधीचा त्रास हा अत्यंत वेदनादायी आहे.

Updated: Jul 3, 2018, 12:32 PM IST
मूळव्याधीमध्ये रक्त पडण्याच्या समस्येवर फायदेशीर 'हा' घरगुती उपाय  title=

मुंबई : मूळव्याधीचा त्रास हा अत्यंत वेदनादायी आहे. सुरूवातीच्या टप्प्यावरच मूळव्याधीच्या आजाराकडे लक्ष न दिल्यास बघता बघता हा त्रास गंभीर होतो. समाजात या आजाराबद्दल खुलेपणाने बोलले जात नसल्याने हा त्रास भयंकर वेदनादायी झाल्यावर त्यावर उपचार शोधले जातात. म्हणूनच  सुरूवातीलाच मूळव्याधीचा त्रास लक्षात आल्यास काही घरगुती उपायांनी यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. 

मेथी ठरते गुणकरी  

स्वयंपाकघरामध्ये मेथीचे दाणे विविध स्वरूपात वापरले जातात. मधुमेहींप्रमाणेच मूळव्याधीच्या रूग्णांसाठीदेखील मेथी फायदेशीर आहे. मेथीच्या दाण्यांमध्ये फोलिक अ‍ॅसिड, मॅग्नीशियम, सोडियम, झिंक, कॉपर, नियासिन, थियामिन, कॅरोटीन हे घटक आढळतात. मूळव्याधीचा त्रास 7 दिवसात दूर करणारे घरगुती मलम

कसे ठरतात मेथीचे दाणे फायदेशीर ? 

भिजवलेले मेथीचे दाणे मूळव्याधीचा त्रास मूळासकट नष्ट करण्यास मदत करते. नियमित सकाळी रिकाम्या पोटी मेथीचे दाणे चावून खाल्ल्यास फायदेशीर ठरतात. 

5 ग्राम मेथी आणि 5 ग्राम सोयाबीन एकत्र दळून सकाळ संध्याकाळ पाण्यासोबत प्यायल्यास फायदा होतो. तुम्हांला हे मिश्रण कडवट वाटत असल्यास त्यामध्ये थोडी साखर मिसळू शकता. 

मेथी दाण्याची पेस्ट त्रास होत असलेल्या, खाज येत असलेल्या, जळजळ होत असलेल्या जागी लावल्यास आराम मिळतो.  मूळव्याधीच्या समस्येवर जादुई ठरतील हे '8' घरगुती उपाय