तुमची जीभ अशी दिसू लागली तर सावधान, शरीरात उद्भवू शकते Vitamin B12 ची तीव्र कमतरता
व्हिटॅमिनच्या कमतरतेचे निदान करणे कठीण आहे. पण जर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता असेल, तर जीभेमुळे ओळखू शकता.
मुंबई : सध्या लोक आपल्या कामात इतके व्यस्त झाले आहेत की, त्यांना आपल्या स्वत:च्या आरोग्याकडे पाहण्यासाठी वेळ नाही. लोकांच्या झोपण्याच्या, खाण्याच्या, उठण्याच्या सगळ्याच वेळा बदलत चालल्या आहेत. ज्याचा परिणाम आरोग्यावर होत आहे. खरंतर जीवनशैलीतील सततच्या बदलांमुळे शरीराला आवश्यक पोषक आणि जीवनसत्त्वांची कमतरता भासत आहे. शरीराला अनेक प्रकारची जीवनसत्त्वे आवश्यक असतात. यापैकी एक व्हिटॅमिन बी 12 आहे.
व्हिटॅमिनच्या कमतरतेचे निदान करणे कठीण आहे. पण जर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता असेल, तर जीभेमुळे ओळखू शकता. ते कसं ओळखायचं आणि आपली जीभ नक्की काय संदेश देते? जाणून घेऊ या.
शरीरासाठी व्हिटॅमिन बी 12 हा सर्वात पौष्टिक पर्यायांपैकी एक आहे. पाण्यात विरघळण्याव्यतिरिक्त, ते शरीराच्या अनेक क्रियाकलापांमध्ये सामील आहे. जे शरीरात लाल रक्त पेशी, डीएनए तयार करण्यास मदत करते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, मानवी मज्जासंस्थेला निरोगी बनवण्यासाठी व्हिटॅमिन बी 12 खूप महत्वाचे आहे. शरीरात या जीवनसत्त्वाची कमतरता असल्यास अनेक घातक आजार होऊ शकतात. त्यामुळे शरीरात व्हिटॅमिन बी 12ची कमतरता होऊ देऊ नका.
शरीरात व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे लोकांना जिभेच्या अल्सरचा सामना करावा लागतो. अशा स्थितीत तुमच्या जिभेवर पुरळ येणे आणि जीभ लाल होणे अशा समस्या उद्भवत असतील तर समजा की, तुमच्या शरीरात व्हिटॅमिन बी 12ची कमतरता आहे.
या उलट कधीकधी जीभ एकदम गुळगुळीत होणे. जिभेवर आढळणारे तंतू नाहीसे होणे असं देखील तुम्हाला आढळलं तर हे देखील व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता दर्शवते.
व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेची लक्षणं खालील प्रमाणे
- त्वचा पिवळी पडणे
- जिभेवर पुरळ येणे किंवा लाल होणे
- दृष्टी कमी होणे
- तोंडात फोड येणे
- स्मरणशक्ती कमी होणे
- स्मृतिभ्रंश
- जास्त अशक्तपणा किंवा सुस्ती
- नैराश्य
व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेसाठी उपाय
तुम्हाला व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता जाणवली तर आहारात मासे, मांस यासारख्या गोष्टींचा समावेश करा. त्यात भरपूर जीवनसत्त्वे असतात. शिवाय अंडीही खावेत. एका मोठ्या अंड्यामध्ये (50 ग्रॅम) .55 mcg जीवनसत्व B12 असते. ज्याचा तुमच्या शरीराला फायदाच होईल.
दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, तसेच तर डेअरी उत्पादने देखील व्हिटॅमिन बी 12 चे उत्कृष्ट स्त्रोत आहेत. रोजच्या आहारात त्यांचा समावेश करा.
तसेच सोया मिल्क हे व्हिटॅमिन बी 12 सत्त्वांचा चांगला स्रोत आहे.