मुंबई : हिंदू संस्कृतीमध्ये श्रावण महिन्याला अनन्यसाधारण महत्व आहे. श्रावण महिना अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. श्रावण महिना हा हिंदू धर्मातील पवित्र महिन्यांपैकी एक आहे. या महिन्यात व्रतवैकल्यांसोबतच उपवास केले जातात. उपवासाचे महत्त्व धार्मिक कारणांपुरता मर्यादीत नाही तर या दिवसात उपवास करण्याचे काही आरोग्यदायी फायदेदेखील आहेत. बदलत्या वातावरणात जर तुम्हा उपवास करणार असाल तर आहारात सकारात्मक बदल करणे आवश्यक आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उपवास करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाल ? 
-  दिवसातून दोन वेळाच जेवण करणार असाल तर सकाळी ८ ते ११ यावेळेत व संध्याकाळी ५ ते ७ यावेळेत जेवणे हितकारी आहे.


-  सकाळी उठल्याबरोबर व रात्री झोपताना उकळलेले पाणी प्यावे. फ्रीजचे, माठाचे पाणी पाणी पिणे शक्यतो टाळा. 


-  सकाळी तासभर ५-६ किमी भराभर चाला


- फिरायला जाण्यापुर्वी ग्लासभर कोमट पाणी आणि आल्यानंतर साखर न घालता १ कप लेमन टी पिऊ शकता.