मुंबई : तुमची उंची किती? असा सहज प्रश्न विचारला जातो. उंची हवी असं म्हणणाऱ्यांना मात्र उंच माणसांचं दु:ख कधी समजत नाही. अगदी शाळेत मागे उभं राहण्यापासून ते पाठदुखीच्या आजारापर्यंत अनेक दुखणी उंच माणसांकडे असतात. पण आता आणखी एक सर्व्हेमधून एक माहिती समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्यांची उंची 5 फूट किंवा 5 फूट 9 इंचापेक्षा कमी आहे त्यांना 100 आजारांचा धोका असल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे. तज्ज्ञांनी 2,50,000 महिला आणि पुरुषांवर केलेल्या सर्व्हेमधून हे समोर आलं आहे. त्यांना अनेक आजारांचा धोका उद्भवतो. अशा लोकांना हृदयविकाराचा धोका, नसांशी संबंधित आजार, अल्सरसारखे आजार होतात. 


हृदयाचे ठोके अनियमित होणं, व्हेरिकोज व्हेन्सचा जास्त धोका, पेरिफेरल न्यूरोपॅथी असण्याची जास्त शक्यता, हात, पाय आणि हात यासारख्या शरीराच्या अवयवांमध्ये सुन्नपणा, मुंग्या येणे किंवा वेदना होऊ शकतात. अल्सर सारख्या हाडे आणि त्वचेच्या संसर्गाचा धोका वाढतो असंही या अभ्यासात समोर आलं आहे. 


उंच लोकांना रक्तस्ताव शरीरात नीट होण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे आरोग्याचा समस्या समोर येतात. जिथे रक्तपुरवठा अपुरा पडतो तिथे आजाराला सुरुवात होते. या लोकांना जेनेटिक आजाराचाही धोका असू शकतो असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. 


एखाद्या व्यक्तीची उंची त्याच्या अनुवांशिकतेसह विविध घटकांद्वारे निर्धारित केली जाते, ज्यामुळे ते उंच किंवा लहान असण्याची शक्यता असते. पण ज्या मुलांनी सकस आहार घेतला आहे आणि जे श्रीमंत पार्श्वभूमीचे आहेत त्यांची उंची वाढण्याची शक्यता अधिक असते अशा मुलांमध्ये जीवनशैली देखील भूमिका बजावते. रॉकी माउंटन रिजनल व्हीए मेडिकल सेंटरमधील शास्त्रज्ञांनी याबाबत अभ्यास करून ही माहिती दिली आहे.