मुंबई : आपल्या भारतीयांची सकाळ एक कप चहाने होते. असे अनेक चहा प्रेमी आहेत, ज्यांना सकाळी वेळेवर चहा मिळाला नाही, तर त्यांचा संपूर्ण दिवस खराब जातो. एक कप चहा तुम्हाला दिवसभर ऊर्जावान ठेवण्यास मदत करतो. यामुळे तुम्हाला दिवसभर फ्रेश वाटते. अनेक लोक तर बेड टी देखील घेतात. म्हणजेच सकाळी डोळे उघडल्याच क्षणी त्यांना चहा लागतो. परंतु तुम्हाला माहितीय का की सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायल्याचे अनेक तोटे देखील आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिकाम्या पोटी चहाचे सेवन केल्याने तुमच्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो. चला जाणून घेऊया सकाळी रिकाम्या पोटी चहा पिण्याचे तोटे काय आहेत.


ब्लोटिंग आणि गॅस


सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने ब्लोटिंग आणि गॅसच्या समस्येला सामोरे जावे लागते. याचा तुमच्या पचनसंस्थेवर खूप वाईट परिणाम होतो. म्हणून, सकाळी रिकाम्या पोटी चहा घेऊ नका किंवा अगदी थोड्या प्रमाणात घेण्याचा प्रयत्न करा.


चक्कर येणे


चहामध्ये कॅफिन असते. यामुळे अनेकांना चक्कर किंवा ग्लानी देखील येते. यामुळे डिहायड्रेशन होऊ शकते. त्यामुळे सहसा सकाळी रिकाम्या पोटी चहा टाळा


कमी भूक लागणे


रोज रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने तुमची भूक कमी होते. हे तुमची भूक मारते. बरेच लोक दिवसातून अनेक वेळा चहा पितात. त्यामुळे तुमचा आहार कमी होऊ लागतो. त्यामुळे शरीरात पोषक तत्वांची कमतरता भासते.


निद्रानाश


रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने निद्रानाशाच्या समस्येला सामोरे जावे लागते. त्यात कॅफिन असते. यामुळे तुमच्या झोपेची गुणवत्ता बिघडते. यामुळे तुमच्या रक्तदाबाची पातळीही वाढते. तणावाची समस्या वाढते. अशा परिस्थितीत रिकाम्या पोटी चहा पिणे टाळावे.


पोटात जळजळ


रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने पोटात जळजळ होऊ शकते. त्यामुळे मळमळ, उलट्या, पोटात जळजळ अशा समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे चहाचे सेवन मर्यादित प्रमाणात करा आणि रिकाम्या पोटी चहा पिणे टाळा.


ऍसिडिटी


रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने ऍसिडिटीची समस्या वाढते. त्यामुळे सकाळी रिकाम्या पोटी चहा पिणे टाळा. कारण पचनसंस्थेवर याचा वाईट परिणाम होतो.


छातीत जळजळ समस्या


रोज चहा प्यायल्याने छातीत जळजळ होऊ शकते. हे आतड्यांमध्ये ऍसिडचे उत्पादन वाढवते. त्यामुळे छातीत जळजळ होण्याची समस्या निर्माण होते.


(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)