Ayurvedic Remedies for Teeth Whitening : दात आपल्या शरीरातील महत्त्वाच्या अवयवांपैकी एक आहे. दातांच्या मजबूतीकरता रेग्युलर चेकअप गरजेचे आहे. अनेकदा लोकं दातांच्या आरोग्याबाबत निष्काळजीपणा करतात. यामुळे हळू हळू दातांमध्ये दुखणे, दात तुटणे किंवा कॅविटी होणासारख्या समस्या जाणवतात. घरीच असलेल्या या 6 घरगुती आयुर्वेदिक उपायांनी दातांचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर तुमचे दात स्वच्छ आणि निरोगी असतील तर तुम्ही कोणतेही पदार्थ सहज खाऊ शकता. एवढंच नव्हे तर तुमचं आरोग्य निरोगी राहण्यासाठी देखील मदत होते. 


व्हीट ग्रास वॉटर 


दातांमध्ये होणाऱ्या कॅविटिजच्या त्रासामुळे व्हीट ग्रास वॉटरचे सेवन करणे गरजेचे असते. यामध्ये अँटी ऑक्सीडेंट्स आणि क्लोराफिल दातांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. यामध्ये असणाऱ्या गुणांमुळे दातांचा पिवळेपणा आणि बॅक्टेरिया रोखण्यास मदत होते. 


दातुनचा वापर 


खूप वर्षांपासून दात स्वच्छ करण्यासाठी दातुनचा वापर केला जातो. दात स्वच्छ करण्यासाठी कडुलिंब, बोर आणि गावठी बाभूळच्या दातून म्हणून वापर केला जाते. यामुळे दातांच्या कॅविटीपासून आराम मिळतो आणि येणारा घाणेरडा वासही कमी होतो. नैसर्गिक माऊथ फ्रेशनर म्हणून याचा वापर करू शकता. 


हळद, मीठ आणि तिळाचे तेल 


तिळाच्या तेलाने अनेकदा जेवण बनवले जाते. किंवा डोक्याला आराम मिळावा म्हणूनही वापरले जाते. यामध्ये अँटी मायक्रोबियल गुणांनी समृद्ध असलेल्या या तेलामुले बॅक्टेरिया दूर होण्यास मदत होते. यामुळे मीठ, हळद आणि तिळाच्या तेलाचे मिश्रण दातांना लावावे. दिवसातून एकदा तरी दात साफ करावे. मंजन म्हणून याचा वापर करता येतो.


मीठाचे पाणी 


दातांमधील किडे किंवा दुर्गंधी दूर करण्यासाठी मीठाच्या पाण्याने गुळणी करावी. यामुळे हिरड्या आणि दातांमध्ये जाणारी तीव्र सणक कमी होण्यास मदत होते. जेवण जेवताना गरम किंवा थंड पाणी प्यायल्याने होणारा त्रास कमी होण्यास मदत होते. दिवसातून दोनदा या पाण्याने दात धुतल्यास दात दुखीचा त्रास कमी होईल आणि अगदी मोत्यासारखे चमकतील दात. 


पेरूची पाने 


पेरूच्या पानांमध्ये अँटी इंफलामेंटरी आणि अँटी मायक्रेबियल गुण असतात. दातांच्या आरोग्यासाठी पेरूच्या पानांचा खूप फायदा होतो. तसेच उकळत्या पाण्यात पेरूची पाने टाका यामुळे दात स्वच्छ, मजबूत होतात. तसेच दाताची स्वच्छता देखील चांगली राहते. दातांवरचा पिवळा थर कमी करण्यासाठी फायदा होतो. 


लवंगाचे तेल 


अँटी इंफ्लामेंटरी गुणांनी भरपूर असलेल्या या तेलाने दातदुखी कमी होते. या तेलाचे काही थेंब कापसावर घेऊन ते दातांवरून फिरवावे यामुळे दात स्वच्छ होतील आणि मोत्यासारखे चमकू लागतील. तसेच दातामध्ये लवंग धरून ठेवल्यासही फायदा होतो.