Teeth Whitening Home Remedies: अनेकांना दात पिवळे (Teeth Whitening) पडण्याची समस्या असते. त्यामुळे हसताना मोठी पंचाईत होते. तुमचे पिवळसर दात दिसून येतात. काहीजण हे दात दिसू नये यासाठी हसने टाळण्याचा प्रयत्न करतात, अथवा काही जण दात झाकून हसण्याचा प्रयत्न करतात. मात्र या समस्येवर अनेक उपाय आहेत, हे उपाय वापरून तुम्ही दाताचा पिवळसरपणा (Teeth Whitening Home Remedies) काढू शकता. हे उपाय काय आहेत, हे जाणून घेऊयात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ओठांच्या काठावरील काळे डाग दूर करायचेत, 'हे' घरगुती उपाय करून बघा 


घरगूती उपाय काय?


ऍपल सायडर व्हिनेगर


मर्यादित प्रमाणात सफरचंदचे व्हिनेगर घ्या. 1 ते 2 चमचे सफरचंद (Apple) सायडर व्हिनेगर 3 चमचे पाण्यात मिसळा.ते बोटांनी दातांवर लावून चोळा. अथवा ते ब्रशने देखील घासता येणार. यानंतर पाण्याने दात (Teeth Whitening) पूर्णपणे स्वच्छ करून घ्या. अनेक दिवस तुम्ही हे केल्यानंतर तुम्हाला त्याचा परिणाम दिसेल.


स्ट्रॉबेरी 


दातांचा पिवळेपणा (Teeth Whitening) काढण्यासाठी स्ट्रॉबेरीचा (Strawberry) वापर होतो. नैसर्गिकरित्या दात स्वच्छ करण्यासाठी स्ट्रॉबेरीचा वापर करा. ते बारीक करून दातांवर किमान ५ मिनिटे ठेवा आणि नंतर तोंड धुवा. याशिवाय बेकिंग सोड्यात स्ट्रॉबेरी मिसळूनही दात स्वच्छ करता येतात.


हर्बल पावडर


हर्बल पावडरमुळे (Herbal Powder) दातांच्या अनेक समस्या दुर होतात. जसे दात पिवळे पडणेच नाही तर दातदुखी, पोकळी आणि हिरड्यांमधून रक्त येणे देखील थांबते. ही पावडर बनवण्यासाठी कडुनिंब, तुळस आणि बेकिंग सोडा समप्रमाणात मिसळा. तुम्ही 1 ते 2 लवंगाच्या कळ्या बारीक केल्यानंतर त्यात घालू शकता. या पावडरने दात घासल्यास (Teeth Whitening) चांगला परिणाम होतो.


बेकिंग सोडा 


बेकिंग सोड्याने (Baking Soda) दात स्वच्छ केल्याने पिवळ्या दातांची समस्या दूर होऊ शकते. यामुळे बॅक्टेरिया देखील दूर राहतात आणि श्वासाची दुर्गंधी दूर होते. हे वापरण्यासाठी, एक चमचा बेकिंग सोडामध्ये पाणी मिसळून घट्ट पेस्ट बनवा आणि ब्रशमध्ये घेऊन दात स्वच्छ करा.


(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)