ओठांच्या काठावरील काळे डाग दूर करायचेत, 'हे' घरगुती उपाय करून बघा

'हे' उपाय ओठांच्या काठावरील काळे डाग दूर करतील, आजपासून करून बघा 

Updated: Nov 24, 2022, 04:11 PM IST
 ओठांच्या काठावरील काळे डाग दूर करायचेत, 'हे' घरगुती उपाय करून बघा title=

Dark Spots Near Mouth : अनेकांना ओठांभोवती काळे डाग (Dark Spots) पडण्याची समस्या उद्भवत असते. या समस्येपासून कशी सुटका करावी, असा प्रश्न अनेकांना पडत असतो. काही लोक अनेक उपाय करत असतात, मात्र तरीही त्याचा काही फायदा होत नाही. आज आम्ही असेच काही उपाय सांगणार आहोत, हे उपाय करून तुम्ही तुमच्या ओठांच्या काठावरील काळे डाग (Dark Spots) दूर करू शकता. हे उपाय (home remedies) कोणते आहेत ते जाणून घेऊयात.

 हे ही वाचा : घरबसल्या फक्त 'ही' 3 योगासने करा, राहाल एकदम फिट

हायपरपिग्मेंटेशन, हवामानातील बदल, ओठांवर जीभ वारंवार वापरणे किंवा व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे ओठांभोवती काळे डाग (Dark Spots) येत असतात. ओठांच्या सभोवतालच्या काळ्या डागांसाठी खालील घरगुती उपाय (home remedies) आहेत, जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.

उपाय काय?

लिंबाचा रस

लिंबाच्या रसामध्ये सायट्रिक ऍसिड वापरून त्वचेचे रंगद्रव्य दूर करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. यासाठी अर्धा लिंबू ओठांवर चोळा आणि १५ मिनिटे ठेवल्यानंतर धुवा. लिंबाच्या रसात मध मिसळूनही त्वचेवर लावू शकता.

काकडीचा रस

एक चमचा काकडीच्या रसात समान प्रमाणात लिंबाचा रस (Lemon Juice) मिसळा आणि कापसाच्या मदतीने ओठांच्या जवळ असलेल्या डागांवर लावा. त्यानंतर 10 ते 15 मिनिटांनी ते धुवा

बटाट्याचा रस

अर्धा बटाटा एका भांड्यात किसून घ्या आणि त्याचा रस काढण्यासाठी पिळून घ्या. हा रस काळ्या त्वचेवर गोलाकार हालचालींमध्ये लावा. 20 मिनिटे ठेवल्यानंतर स्वच्छ धुवा. ही कृती संवेदनशील त्वचा असलेल्या लोकांसाठी देखील प्रभावी आहे.

दुधाची मलई

एका भांड्यात दुधाची साय (Milk Cream) घ्या आणि ती बोटांनी ओठांच्या आसपासच्या त्वचेवर चोळायला सुरुवात करा. डागांवरून मृत त्वचा निघू लागते. सायमध्ये हळदही मिसळू शकता. हळद हे डाग हलके करण्यास मदत करते.

पपई

व्हिटॅमिन सी आणि एने समृद्ध पपई गडद पॅचवर चांगला प्रभाव दर्शवते. ते लावण्यासाठी कच्ची पपई घ्या आणि मिक्स करा आणि त्यात गुलाबजल मिसळून पेस्ट बनवा. हा मास्क अर्धा तास ओठांभोवती ठेवल्यानंतर थंड पाण्याने धुवा. 

(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)