मुंबई : आजच्या काळात लोक सुरक्षित शारीरिक संबंध ठेवण्यासाठी कंडोमचा वापर करतात. हे खूप सुरक्षित आहे आणि गर्भधारणा टाळता येऊ शकते. लग्नानंतरही अनेकदा लोक कंडोम वापरायला लागले आहेत. पूर्वीच्या तुलनेत, आता लोक लग्नानंतर लगेच मुलांचा विचार करत नाहीत. यासाठी आता लोकांनी कंडोम वापरण्यास सुरुवात केलीये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंडोमबद्दल बोलायचे झाले तर आता महिलांसाठीही ती एक सामान्य गोष्ट झाली आहे. आता महिलांसाठीही कंडोम बनवले जातात. ज्याचा वापर महिलाही करतात. हे खूप सुरक्षित मानलं जातं, ज्यामुळे लोकं त्याचा वापर करतात. पण तुम्हाला माहित आहे का पुरुष कंडोम आणि महिला कंडोममध्ये काय फरक आहे? जर नसेल तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की या दोन प्रकारच्या कंडोममध्ये काय फरक आहे.


जर आपण महिला आणि पुरुष कंडोममधील सामान्य फरकाबद्दल बोलायला गेलो, तर पुरुष कंडोम लेटेक्स, पॉलीयुरेथेन, पॉलीसोप्रीनपासून बनवलेले असतात. जे इरेक्शनच्या वेळी वापरले जातात. त्याच वेळी, महिलांचे कंडोम पॉलीयुरेथेन किंवा नायट्राइलपासून बनवले जातात, जे महिलांच्या योनीचे संरक्षण करतात आणि नको असलेली गर्भधारणा टाळतात. 


महिला कंडोम हे एका पाऊचसारखे असतं ज्याच्या आत दोन टोकं असतात. या पाऊचचं एक टोक बंद असतं आणि दुसरे टोक उघडं असते. या दोन्हीवर 2 रिंग असून ज्या महिला योनीमार्गात याचा सहजतेने वापर करू शकतात. 


एलर्जी होण्याचा धोका?


महिला कंडोम वापरल्याने गुप्तांग पूर्णपणे झाकलं जातं. पुरुषांच्या कंडोम लेटेक्सपासून बनलेलं आहे, ज्यामुळे ऍलर्जीक प्रतिक्रियांचा धोका वाढतो. पण स्त्रियांचा कंडोम हा हायपोअलर्जिक असतो, त्यामुळे अॅलर्जी होत नाही.