मुंबई : भारतात कोरोना प्रकरणांमध्ये चढ-उतार होताना दिसतेय. गेल्या 24 तासांत 11,793 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. जे ही प्रकरणं एका दिवसापूर्वी आलेल्या प्रकरणांपेक्षा 32 टक्के कमी होती. देशातील बहुतेक राज्यांमध्ये संसर्ग नियंत्रणात आहे, परंतु महाराष्ट्र आणि केरळमध्ये एक्टिव्ह कोरोना रुग्ण आणि पॉझिटीव्हीटी प्रमाण कमी होत नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशातील एकूण एक्टिव्ह प्रकरणांपैकी 56 टक्के प्रकरणं फक्त महाराष्ट्र आणि केरळमधील आहेत. या राज्यांमध्ये कोरोनाचा पॉझिटिव्ह दरही 10 टक्क्यांहून अधिक आहे. केरळमधील पझिटीव्हीटी रेट 18.05 टक्के झाला आहे. म्हणजेच या राज्यात 100 चाचण्यांमागे 18 जणांना संसर्ग होतोय. केरळमध्ये गेल्या 15 दिवसांपासून संसर्गाचे प्रमाण सातत्याने वाढत आहे.


आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात एक्टिव्ह रुग्णांची संख्या 25,570 आहे आणि केरळमध्ये 27,919 आहे. या दोन्ही राज्यांमध्ये मृत्यूच्या घटनांमध्ये वाढ होत नाहीये, ही दिलासादायक बाब आहे. 


तज्ज्ञांच्या मते, काही दिवस नवीन केसेस वाढत राहतील, पण घाबरण्याची गरज नाही. कारण रूग्णालयात दाखल होण्याचं प्रमाण वाढत नाहीये. बहुतेक लोकांना Omicron आणि त्याच्या वेगवेगळ्या सब-व्हेरिएंटची लागण होतेय. संक्रमितांमध्ये फक्त सौम्य लक्षणं आढळून येतायत. 


नवीन व्हेरिएंट आला नाही


एनसीडीसीच्या म्हणण्यानुसार, सध्या देशात कोरोनाचे कोणतेही नवीन व्हेरिएंट आढळून आले नाहीत. एनसीडीसीचे संचालक डॉ. सुजित सिंग म्हणतात की, देशात प्रकंणे वाढत असली तरी तपासात नवीन व्हेरिएंट आढळून आलेले नाहीत. नवीन व्हेरिएंट तपासण्यासाठी चाचण्या देखील सातत्याने केल्या जातायत. रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांच्या लक्षणांवर लक्ष ठेवलं जातंय.