मुंबई : सामान्यपणे थोडंस दुखायला लागल्यावर डॉक्टरांची परवानगी न घेता पेनकिलर घेतली जाते. पण ही पेनकिलर आपल्या शरिरासाठी हानिकारक असल्याचं आपल्याला माहित आहे. तरीही या गोळ्या सर्रास घेतल्या जातात. या औषधांमुळे हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढण्याची दाट शक्यता असते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'बीएमजे'मध्ये प्रकाशित केलेल्या अध्ययनात याची माहिती आहे. डायक्लोफेनेकच्या ऐवजी पॅरासिटामोल किंवा इतर औषधांचा वापर केला जाऊ शकतो. डेनमार्कच्या आरहुस युनिर्व्हसिटी हॉस्पिटलमध्ये झालेल्या संशोधनातून समोर आलं आहे की, डायक्लोफेनेक शरिरासाठी खूप घातक आहे. ही गोळी कोणत्याच स्टोरवर उपलब्ध न होणे हेच योग्य आहे. आणि जरी ही गोळी बाजारात उपलब्ध झालीच तरी पण पॅकेटमध्ये न मिळणं जास्त फायदेशीर आहे. 


डायक्लोफेनेक दुखणे आणि सूज येणे यावर त्याचा वापर केला जातो. पारंपरिक नॉन स्टेरॉयड एन्ट्री इंफ्लॅमेटरी औषध आहे. हे अगदी व्यापक स्वरूपात जगभरात कुठेही उपलब्ध होते. त्यामुळे सर्रास अशा पेनकिलचा वापर करण्यापूर्वी थोडा विचार करा.