Itchy Breasts: स्तनांना खाज येण्याची ही 5 कारण असू शकतात
अनेकदा महिलांना ब्रेस्ट म्हणजेच स्तनांना खाज येण्याची समस्या जाणवते.
मुंबई : महिलांच्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव म्हणजे ब्रेस्ट. या अवयवाशी मोकळेपणाने बोलणं अजूनही महिला टाळतात. अनेकदा महिलांना ब्रेस्ट म्हणजेच स्तनांना खाज येण्याची समस्या जाणवते. काहीवेळा ही खाज थांबण्याचं नाव घेत नाही. सतत स्तनांच्या त्वचेवर खाजवल्याने त्वचेवर रॅशेस येणं तसंच त्वचा लाल होणं या तक्रारी उद्भवतात.
जर तुम्ही देखील त्या स्त्रियांपैकी असाल ज्यांना स्तनांभोवती खाज सुटण्याची तक्रार आहे, तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. त्याऐवजी, तुम्ही त्याकडे त्वरित लक्ष देणं आवश्यक आहे. दरम्यान जाणून घेऊया कोणत्या कारणांमुळे स्तनांना खाज येण्याची तक्रार उद्भवू शकते.
योग्य 'ब्रा'ची निवड न करणं
काही प्रमाणात, ब्रासाठी वापरण्यात येणारं फॅब्रिक देखील स्तनांना खाज येण्यास जबाबदार ठरतं. ब्रा कॉटन, पॉलिस्टर, होजरी, स्पॅंडिक्स, सिल्क अशा प्रकारच्या कापडांपासून बनतात. यातील काही फॅब्रिक्स असं आहेत, जे त्वचेला शोभत नाहीत आणि ते घातल्यानंतर तुम्हाला खाज येऊ शकते.
सर्नबर्नमुळे होणारे रॅशेस
अनेक महिलांची त्वचा सूर्यप्रकाशासाठी अधिक संवेदनशील असते. अशा महिलांना स्तनांच्या त्वचेला जळजळ होऊ शकते. एवढेच नाही तर सनबर्नच्या तक्रारीने करते, स्तनात अधिक खाज येऊ शकते. काही प्रकरणांमध्ये, सूर्यप्रकाशामुळे हीट रॅशेस स्तनांमध्ये खाज निर्माण करतात.
अयोग्य साबण आणि डिटर्जंटचा वापर
आंघोळीसाठी चुकीचा साबण आणि कपडे धुण्यासाठी डिटर्जंट वापरल्याने त्वचेला त्रास होऊ शकतो. त्यामुळे तुमच्या त्वचेनुसार योग्य साबण निवडा. विशेषतः असे साबण आणि डिटर्जंट्स वापरा ज्यामुळे एलर्जी होणार नाही. डॉक्टरांचं म्हणणं आहे की, ब्रा धुल्यानंतर ती उन्हात वाळवावी, जरी ते वॉशिंग मशीनमध्ये पूर्णपणे वाळवलेली असेल तरीही. संवेदनशील त्वचा असलेल्या लोकांनी अशा परिस्थितीत अत्यंत सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे.
ब्रा नियमितपणे न धुणं
न धुतलेल्या ब्रामुळे देखील स्तनांना खाज येऊ शकते. जर महिलांना स्तनामध्ये किंवा आजूबाजूला जखम झाली असेल तर न धुतलेल्या ब्राच्या वापराने समस्या अधिक बळावू शकते. ज्यामुळे बॅक्टेरियाची पैदास होऊ शकते. म्हणूनच डॉक्टरही स्त्रियांना दररोज ब्रा धुण्याचा सल्ला देतात.
गर्भावस्था आणि स्तनपान
गर्भधारणेनंतर स्तनपानामुळे स्तनाचा आकार बदलतो. यामुळे स्तनांना खाज येऊ लागते. स्तनपान प्रक्रियेदरम्यान स्तनपानाची त्वचा कोरडी आणि ताणली जाणं सामान्य आहे.