नवी दिल्ली: जगभरात आता नव्या कोरोना व्हेरिएंटनं थैमान घातलं आहे. या नव्या व्हेरिएंटमुळे सर्व देशांची झोप उडाली आहे. 13 देशांमध्ये  Omicron चा संसर्ग आहे तिथून 466 प्रवासी देशात आले आहेत. त्यामुळे आता भारताचंही टेन्शन वाढलं आहे. दुसरीकडे एका संस्थेनं Omicron आणि लसीकरण याबाबत एक मोठा दावा केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाचा नवा व्हेरियंट Omicron वर स्पुटनिक लस प्रभावी असल्याचा दावा एका इन्स्टिट्यूटनं केला आहे. गमालेया रिसर्च इन्स्टिट्यूटनं हा दावा केला आहे. गमालेया रिसर्च इन्स्टिट्यूट ही रशियातील 100 वर्ष जुनी रिसर्च संस्था आहे. 


Omicron विरोधात लढण्यासाठी स्पुटनिक व्ही आणि स्पुटनिक लाईट या लसी सक्षम असल्याचं या रिसर्च इन्सिट्यूटनं दावा केला आहे. स्पुटनिक लस घेणाऱ्यांवर Omicron व्हेरियंटचा प्रभाव दिसत नाही असा दावाही गमालेया संस्थेनं केला आहे.



डॉ गुलेरिया यांनी रविवारी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, Omicron चे 30 हून अधिक वेळा म्युटेशन झालं आहे. हे म्युटेशन किंवा बदल विषाणूच्या स्पाइक प्रोटीनमध्ये हा बदल झाल्याचं सांगितलं जात आहे.


डॉ गुलेरिया यांच्या मते, हे नवीन म्युटेशन अधिक घातक आहे. त्यामुळे लसही त्यावर किती प्रभावी ठरेल याबाबत शंका व्यक्त केली आहे. त्यामुळे या नव्या व्हेरिएंटसाठी देशातही प्रशासन अलर्टवर आहे.