Diabetes Care : मधुमेह, शुगर किंवा डायबिटीज हा झपाट्याने पसरणारा आणि गंभीर आजार आहे. दुर्दैवाने, मधुमेहावर कायमस्वरूपी कोणताही उपचार नाही. पण ते नियंत्रणात ठेवल्यास आपण सामान्य जीवन जगू शकता.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मधुमेहाच्या रुग्णांसाठी गोड पदार्थ विषापेक्षा कमी नसतात कारण त्यामुळे ग्लुकोजची पातळी नियंत्रणाबाहेर जाते. परिणामी लठ्ठपणा, उच्च कोलेस्ट्रॉल हृदयविकार यांसारख्या समस्या उद्भवू लागतात. मधुमेहाच्या रुग्णांनी नेहमी आरोग्यदायी पदार्थांची निवड करावी. परंतु काही लोक त्यांच्या खाण्यापिण्याच्या इच्छेवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत आणि काही वेळा ते अशा गोष्टी खाण्यास सुरुवात करतात की, त्या त्यांच्या आरोग्यासाठी खूप धोकादायक आहेत. भारतातील प्रसिद्ध पोषण तज्ज्ञ निखिल वत्स यांनी सांगितले की, मधुमेहाच्या रुग्णाने असे काही खाणे आणि पेय टाळावे अन्यथा रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढू शकते. 


- आपल्यापैकी अनेकांना दुधात चॉकलेट सिरप मिसळून प्यायला आवडते. पण ही सवय मधुमेहाच्या रुग्णांसाठी धोक्याची ठरू शकते. चॉकलेट मिल्कमध्ये साखरेचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे त्यापासून दूर राहणे जास्त चांगले होईल.
- दही हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जात असले तरी आजकाल बाजारात चवीच्या दह्याची मागणी वाढली आहे. हे रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढवण्याचे काम करते.
- जास्त कॉफी न पिण्याचा सल्ला दिला जातो, कारण त्यात कॅफिन असते आणि ती रक्तदाब वाढवण्यासाठी कुप्रसिद्ध आहे. काहींना चवीची कॉफी प्यायला आवडते पण त्यात छुपी साखर असते त्यामुळे ती मधुमेहाच्या रुग्णांसाठी अजिबात चांगली नसते.
- ताज्या फळांचा समावेश आरोग्यदायी आहारात केला जातो. परंतु काही फळे अशी आहेत जी रक्तातील ग्लुकोजची पातळी वेगाने वाढवतात. आंबा आणि अननसमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते.
- कोणत्याही पदार्थावर अनेकजण टोमॅटो सॉस घालून खातात. केचपची चव आपल्याला खूप आकर्षित करते परंतु त्यात साखरेचे प्रमाण जास्त असते जे ग्लुकोजची पातळी वाढवण्यास कारणीभूत असते.  


 


 


( वरील माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ते अवलंबण्यापूर्वी, वैद्यकीय सल्ला जरूर घ्या. ZEE 24 Taas याची पुष्टी करत नाही.)