Garlic Health Benefits: आपल्या आहारात लसणाचे अनन्यसाधारण असे म्हत्त्व आहे. घरगुती पदार्थ असो वा दाल तडक्याची फोडणी लसणाचा वापर विविध कारणांसाठी आपल्या आहारात केलाच जातो. लसणाच्या उग्र वासामुळे अनेकदा आपल्याला लसणाचा वापरही स्वयंपाक घरात जास्त करावासा वाटत नाही. परंतु खाद्यपदार्थांसोबतच लसणाचा औषधी वापरही होतो. तेव्हा जाणून घेऊया लसणाचे गुणकारी आणि आरोग्यदायी फायदे. (these are the health benefits of cholesterol tips lifestyle)


  • COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    लसणाचा फायदा किटकनाशकांसाठीही केला जातो तसेच यापासून सर्दीवर उपाय करता येतो. लसणाच्या तेलाच्या वापरामुळे डासही कमी होतात. 

  • लसणाच्या पेस्टनं दात दुखत असल्यास लगेच आराम मिळू शकतो. सांधेदुखीसाठीही लसणाचा वापर केला जातो त्याचबरोबर लसणाचा फायदा हा कानदुखीचाही त्रास कमी होऊ शकतो. 

  • तुमच्या शरीरातील रक्ताची कमतरताही सुधारण्यास मदत होते. 


आणखी वाचा - आई नीतू कपूरनं Ranbir चा फोटो शेअर करतानाच नेटकरी म्हणाले...


  • केस काळे करण्यासाठीही लसणाचा वापर केला जातो. लसणाच्या चार-पाच पाकळ्या घेऊन त्यात गरजेपुरतं मध मिसळ्यास आणि या पेस्टचे सेवन केल्यावर मात्र तुम्हाला केसांच्या रंग परत काळा झालेला पाहायला मिळू शकतो. 

  • लसणाचे सेवन लहानमुलांसाठी फायदेशीर आहे तसेच लहान मुलांना जर श्वसनाचा त्रास झाला असेल तर त्यावरही लसूण गुणकारी आहे. 

  • वजन कमी करण्यासाठीही लसणाचा वापर केला जातो. 

  • लसणाचे सेवन कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित करते. लसणामुळे रक्ताचे शुद्धीकरण होतेच शिवाय रक्त पातळ होते. त्यामुळे रक्ताच्या गाठी निर्माण होत नाहीत त्याचबरोबर मधूमेह रूग्णांसाठीही लसूण फायदेशीर आहे.  महत्त्वाचे म्हणजे लसणाचा फायदा हृदयासाठीही होतो. 

  • लसणामुळे त्वचेच्या समस्या दूर होतात. 

  • लसणामुळे अॅसिडिटी आणि गॅसेसच्या समस्याही दूर होतात. 


आणखी वाचा - करीना, विद्या बालनसोबत जुळलं नाव, पण अभिनेत्याने अरेंज मॅरेज करत सगळ्यांनाच दिला धक्का


लसणात काय काय असतं? 
लसणात अ, ब आणि क जीवनसत्त्वांसह आयोडीन, लोह, पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यासारखे अनेक पोषक तत्त्वे असतात. 


(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)