Tips to control Cockroches from your kitchen: तुम्हाला झुरळांचा त्रास आहे का? तुमच्या घरातील स्वयंपाकघरात झुरळे दिसतात. ही झुरळं फार छोट्या आणि भोगं असणाऱ्या ठिकाणी घर करतात आणि लवकरच घरभर पसरतात. झुरळं अनेक वेळा स्वयंपाकघरात ठेवलेल्या खाद्यपदार्थांच्या जवळही पोहोचतात (Cockroach Problems). यामुळे तुम्ही आजारी पडू शकता. झुरळामुळे तुम्हाला इन्फेक्शन आणि फूड पॉयझनिंगसारख्या समस्या उद्भवू शकतात. (these are the home remedies to control cockroch problem health tips)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे झुरळांचा कायमचा बंदोबस्त करणं आवश्यक ठरतं. खालील घरगूती उपाय तुम्हाला झुरळांचा कायमचा बंदोबस्त करायला मदत करतील. (How to control cockroach in the Kitchen)


आणखी वाचा - प्रेग्नंट आलियाला त्यानं Kiss केलं तेव्हा... घरचे झाले शॉक!


  • बेकिंग सोडाच्या मदतीने झुरळांपासून मुक्त होणे सर्वात सोपे आहे. झुरळांपासून मुक्त होण्यासाठी, बाथरूमच्या नाल्याभोवती आणि स्वयंपाकघरातील सिंकभोवती बेकिंग सोडा शिंपडा. झुरळांना बेकिंग सोडाचा वास आवडत नाही. याने ते नाल्यातून बाहेर येणार नाहीत. नंतर 7 ते 8 तासांनंतर एक कप कोमट पाणी घ्या आणि त्यात 2 चमचे बेकिंग सोडा विरघळवा. हे द्रावण नाल्यात टाका, सर्व झुरळे मरतील.

  • झुरळांपासून मुक्त होण्यासाठी, नाल्याच्या मध्यभागी उकळते पाणी घाला. यामुळे नाल्याच्या आत साचलेली घाण साफ होईल. वेळोवेळी नाल्यात गरम पाणी टाकत रहा. घाणीमुळे झुरळांची वाढ होते. गरम पाण्यामुळे नाल्यातील झुरळेही मरतात.

  • घरातून झुरळांपासून सुटका मिळवण्यासाठी पांढरा व्हिनेगर आणि पाणी समान प्रमाणात मिसळा. नंतर हे द्रावण नाल्यात टाका. सर्व झुरळे व्हिनेगरच्या वासाने पळून जातील आणि नवीन झुरळे नाल्यातून येणार नाहीत.

  • वास्तविक, बोरिक ऍसिडच्या संपर्कात आल्याने झुरळाचे पाय आणि पंख चिकटतात. झुरळ जरी बोरिक अॅसिड प्यायले तरी त्याचा मृत्यू होतो. बाथरूमच्या नाल्याजवळ आणि स्वयंपाकघरातील सिंकजवळ बोरिक पावडरची फवारणी करून झुरळांपासूनही सुटका होऊ शकते. 


(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)