दिल्ली : कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. अशातच काही दिवसांपूर्वी फ्रान्समध्ये कोरोनाचा नवा  IHU हा नवा व्हेरिएंट सापडला आहे. यामुळे पुन्हा एकदा चिंतेत भर पडली आहे. IHU समजून घेण्यासाठी अजून संशोधन केलं जातंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'मिरर'च्या अहवालानुसार, जेव्हा हा व्हायरस नव्या स्वरूपात दिसून येतो तेव्हा त्याच्याशी लढणं आणखी कठीण होते. कारण त्या व्हायरसवर उपचार आणि लस परिणाम करेलच असं नाही. अशा परिस्थितीत IHU किती धोकादायक आहे हा प्रश्न सर्वांच्या मनात आहे.


Omicron पेक्षा अधिक म्युटेंट


दक्षिण फ्रान्समधील IHU Mediterranee हॉस्पिटलमधील संशोधकांनी या व्हेरिएंटचा शोध लावला. त्यामुळे कोरोनाच्या या व्हेरिएंटला IHU असं नाव देण्यात आलंय. 


मिळालेल्या माहितीनुसार, फ्रान्समध्ये एकूण 12 जणांना याचा संसर्ग झाल्याची माहिती आहे. संशोधनात असं आढळून आलं आहे की या व्हेरिएंटमध्ये 46 म्यूटेशन झाले आहेत, जे ओमिक्रॉनपेक्षा अधिक आहेत. 


आतापर्यंत केलेल्या IHU व्हेरिएंटच्या अभ्यासातून असं दिसून आलंय की, त्याचं निदान झालेल्या पहिल्या व्यक्तीमध्ये केवळ काही सौम्य श्वसनासंबंधी लक्षणं दिसून आली होती. B.1.640.2 हा व्हेरिएंट नोव्हेंबरमध्ये फ्रान्समध्ये पहिल्यांदा नोंदवला गेला.  ज्या व्यक्तीला पहिल्यांदा संसर्ग झाला होता तो कॅमेरूनच्या परतला होता. 


इम्पीरियल कॉलेजचे व्हायरोलॉजिस्ट टॉम पीकॉक यांनी सांगितलं की, या व्हेरिएंटमुळे खूप त्रास देण्याची शक्यता आहे, परंतु अजूनपर्यंत असं आढळलं नाही. अमेरिकन एपिडेमियोलॉजिस्ट एरिक फीगल-डिंग म्हणाले की, व्हायरसचे नवीन व्हेरिएंट वेळोवेळी दिसतात, परंतु प्रत्येक व्हेरिएंट हा धोकादायक असतो असं नाही.